शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:46 IST

५ मे राेजी होणार पुढील सुनावणी

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : भडकावू भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेटाळले आहेत. आपण केवळ टोल भरू नका, असे वक्तव्य केले असल्याचे ठाकरे यांनी न्यायाधीशांना सांगितले. हा खटला पुढे सुरू राहणार असून ५ मेला यावर पुढील सुनावणी होणार आहे.वाशी येथे २०१४ मध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. यामुळे भडकावू भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीला ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावूनही ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी १२.३० वाजता ते सीबीडी येथील वाशी न्यायालयात न्यायाधीश विकास बडे यांच्यापुढे सुनावणीला हजर राहिले. या वेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना पोलिसांनी लावलेले आरोप मान्य आहेत का? याबाबत विचारणा केली असता त्यांनी ते फेटाळले. भाषणात आपण केवळ टोल भरू नका, असे बोललो असल्याचे ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावरून ठाकरे यांचे वकील राजन शिरोडकर, अक्षय काशीद यांनी त्यांच्या जामिनाचा अर्ज केला होता. त्यावर निर्णय देत न्यायाधीश विकास बडे यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. या खटल्याची पुढची सुनावणी ५ मे आहे. मात्र त्यासाठी पुन्हा न्यायालयात हजर राहण्याची वेळ ठाकरे यांच्यावर येऊ नये यासाठी वकिलांनी कायमस्वरूपी गैरहजेरीची मागणी केली असता न्यायालयाने ती मंजूर केल्याचे वकिलांनी सांगितले.जामीनदाराची फिरकी राज ठाकरे यांना मनसे पदाधिकारी श्याम कोळी जामीनदार राहिले आहेत. त्यामुळे ठाकरे यांना पुन्हा न्यायालयात हजर करायचे असल्यास ती जबाबदारी त्यांची असल्याची समज न्यायाधीशांनी त्यांना दिली आहे. यामुळे सुनावणी झाल्यानंतर कोळी हे ठाकरेंच्या समोर आले असता, “अच्छा, तू मला कोर्टात हजर करणार का?” असा प्रश्न करत त्याची फिरकी घेतली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे