शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

पनवेलमध्ये एकाच वेळी सहा ठिकाणी मतमोजणी

By admin | Updated: May 13, 2017 01:25 IST

पनवेल महापालिका निवडणूक सुरळीत पार पडावी, याकरिता प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गडबड,

अरुणकुमार मेहत्रे । लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका निवडणूक सुरळीत पार पडावी, याकरिता प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गडबड, गोंधळ निर्माण होवू नये याकरिता कामांचे सहा ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मतमोजणीसुद्धा एकाच ठिकाणी न होता स्वतंत्र होणार आहे. निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेले पनवेलचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी याबाबत योग्य नियोजन केले आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण २० प्रभागांचा समावेश आहे. त्यामधून ७८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. शहरासह सिडको वसाहतीत आणि समाविष्ट करण्यात आलेले गाव महापालिका हद्दीत आहे. विस्तृत क्षेत्रफळ असलेल्या पनवेल महापालिका हद्दीत ५,०९,९०१ इतकी लोकसंख्या तर ४,२५,४५३ इतके मतदार आहेत. एकूण ५७० मतदान केंद्रांवर २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीकरिता एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे तीन ते चार प्रभाग देण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देण्यात आला. नावडे, कळंबोली, खारघर, कामोठे, व्ही.के. हायस्कूल आणि पनवेल महानगरपालिका भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी बसतात. त्या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यापासून छाननी, अर्ज मागे घेणे तसेच चिन्ह वाटपाची कामे याच ठिकाणाहून करण्यात आली आहेत. त्यामुळे सिडको नोडमधील उमेदवारांना महापालिकेतील हेलपाटे वाचले आणि त्याच ठिकाणी सर्व कामांचा निपटारा झाला. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय पक्षाला एकाच वेळी एकाच ठिकाणी भव्य शक्तिप्रदर्शनही करता आले नाही. त्याचबरोबर २६ मे रोजी मतमोजणी सुध्दा त्याच ठिकाणी होणार असल्याने वाहतूककोंडी टाळता येईल.