शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ-उरण लोकलचे काउंटडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 03:56 IST

सिडको-रेल्वेचा संयुक्त पाहणी दौरा; आॅक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

नवी मुंबई : बहुप्रतीक्षित नेरुळ-उरण लोकल सेवेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. आॅक्टोबर महिन्यात या मार्गावरील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडको व रेल्वेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सोमवारी या मार्गावरील रेल्वेस्थानकांच्या कामाचा आढावा घेतला. रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून बेलापूर ते खारकोपर स्थानकापर्यंतच्या कामांची पाहणी करण्यात आली.नेरुळ-उरण हा २७ कि.मी. लांबीचा मार्ग आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. नेरुळ (सीवूड) ते खारकोपर हे अंतर १२ कि.मी.चे आहे. तर खारकोपर ते उरण हे अंतर १५ कि.मी.चे आहे. हा संपूर्ण प्रकल्प सिडको आणि रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्यातून उभारला जात आहे. त्यासाठी १७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने दोन्ही यंत्रणांनी कंबर कसली आहे. त्यानुसार सोमवारी सिडको व रेल्वेच्या संयुक्त पथकाने या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. याअंतर्गत तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांतील विद्युत दिवे, पंखे, सीसीटीव्ही यंत्रणा, वॉटर कुलर, तिकीट आॅफिस, प्लॅटफार्म अशा विविध कामांची पाहणी करण्यात आली. सिडकोकडील स्थानकांची कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या आखात्यारित कामे करावी लागणार आहेत, त्यानुसार उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी संबंधित विभागाला दिल्या.या वेळी लोकेश चंद्र यांच्यासह मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. तिवारी, मुख्य अभियंता एस. एस. केडिया, तसेच सिडकोचे मुख्य अभियंता एस. के. चौटालिया, अतिरिक्त अभियंता शीला करुणाकरण आदी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे