शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

कामे होत नसल्याने नगरसेवक संतप्त; नवी मुंबई मनपा प्रशासनावर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:46 IST

कामांना गती देण्याचे सभापतींचे आदेश

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या विविध कामांना मंजुरी मिळाली असतानाही कामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये करीत नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना गांभीर्य नसून, चालढकल करीत असल्याचा आरोप करीत मंजूर झालेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.शहरातील विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. कामे सुरू करण्यासाठी वर्कआॅर्डरही देण्यात आली असून भूमिपूजनही संपन्न झाले आहे; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरु वात झाली नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. या विषयावर चर्चा करताना नगरसेवक सुनील पाटील यांनी नेरु ळ विभागातील रॉक गार्डनच्या संरक्षक भिंतीची दुरवस्था झाली असून उद्यानात सापांचा वावर वाढला असल्याचे सांगितले. सदर भिंतीच्या दुरु स्तीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेविका पूनम पाटील यांनी प्रभागातील विद्युत पोल खराब झाले असून, गाव अंधारात असल्याचे सभेच्या निदर्शनास आणून देत अधिकाºयांकडे पाठपुरावा करून अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. महापालिकेच्या माध्यमातून गावासाठी तीन कमानी बांधण्यात येणार आहेत, या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असूनही अद्याप कामाला सुरु वात झाली नसल्याचे सांगत, प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी प्रभागात जलकुंभ बांधण्याचे काम व महिन्यांपूर्वी मंजूर झालेले आहे तरी कामाला अद्याप का सुरु वात नाही, असा सवाल केला. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी अग्निशमन दलाच्या जखमी जवानांच्या रु ग्णालयाच्या बिलाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला. सुरेंद्र पाटील यांनी सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी अभियंत्यांची बैठक आयोजित केली असल्याचे सांगत मंजूर झालेली आणि वर्कआॅर्डर दिलेली जी कामे सुरू झाली नाहीत, ती सर्वच कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. अग्निशमन जवानांच्या रु ग्णालयाचे बिलही भरले जाणार असल्याचे शिरीष आरदवाड यांनी सांगितले.मेडिकलची असलेला निधी कमी पडल्यास त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणणार असल्याचे आरदवाड म्हणाले. सभापती गवते यांनी अनेक ठिकाणी भूमिपूजन होऊन कामे सुरू झालेली नाहीत. वर्कआॅर्डर दिली जाते; परंतु काम सुरू झाले की नाही, हे पाहायला अधिकाºयांना वेळ नसल्याचे सांगत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. एकमेकांवर चालढकल केली जात असून, सभेचे गांभीर्य नसल्याने उपायुक्त सभेला हजर नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका