शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या कामात भ्रष्टाचार, विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:15 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वात मोठा घोटाळा असून, या विमानतळाची कामे कोणाला व कोणत्या पद्धतीने दिली गेली आहेत, याची चौकशी करण्याची गरज आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.पनवेल येथे गुरुवारी पार पडलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सभेदरम्यान ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे मातब्बर नेते उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत उपस्थित काँग्रेस नेत्यांनी भाजपा व मोदी सरकार विरोधात आक्र ोश व्यक्त केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही भाजपाची खेळी केवळ शिवसेनेला खूश करण्यासाठी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या सभेत केला. लोकांनी सरकारकडून छावण्या आणि चारा मागितला असताना भाजपा सरकारने लावण्या आणि डान्सबार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मोदींनी केवळ चहावर राजकारण केले व योगींनी गाईवर राजकारण केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.दरम्यान, खासदार हुसेन दलवाई , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार माणिकराव जगताप, कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या वेळी ग्रामपंचायत ओवळे येथील सरपंच अ‍ॅडव्होकेट रेश्मा मुंगाजी यांनी आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सभेसाठी बी. एम. संदीप, आमदार भाई जगताप, सचिन सावंत, संतोष शेट्टी, दशरथ भगत, आर. सी. घरत, सुदाम पाटील आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.