शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

निवडणूक न लढवण्याची नगरसेवकाला धमकी, गुन्हा दाखल : विदेशातून दोनदा फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:42 AM

ऐरोलीचे नगरसेवक संजू वाडे यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन येऊ लागले आहेत. निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दे, नाहीतर ठार मारू, अशा धमक्या त्यांना मिळत आहेत.

नवी मुंबई : ऐरोलीचे नगरसेवक संजू वाडे यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन येऊ लागले आहेत. निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दे, नाहीतर ठार मारू, अशा धमक्या त्यांना मिळत आहेत. त्याशिवाय देविदास चौगुले यांची हत्याही आपणच केली असून, तुलाही त्याच्याकडे पाठवेन, अशी धमकी दिली आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे शहरातील राजकीय हालचालींवर लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ऐरोलीचे शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे यांना दोन दिवसांत दोनदा जीवे ठार मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. दोन्ही फोन विदेशातून येत असून फोन करणारी व्यक्ती स्वत:ला रवी पुजारी असल्याचे सांगत आहे. पहिला फोन गुरुवारी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा त्यांना फोन आला असून, पुढील ४८ तासांत ठार मारण्याची धमकी दिली आहे. नगरसेवक देविदास चौगुले यालाही आपल्याच माणसाने मारले असून, तुलाही त्याच्याकडे पाठवतो, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिल्याचे वाडे यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.