शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

नगरसेवकाचा शिवसैनिकावर हल्ला

By admin | Updated: October 29, 2015 23:51 IST

राजकीय वादातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जखमीवर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत

नवी मुंबई : राजकीय वादातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जखमीवर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह दोघांना अटक केली आहे.मकरंद म्हात्रे असे जखमी युवा सेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कुकशेत गाव येथे त्याच्यावर चॉपर व रॉडने हल्ला केला. त्याच परिसरात राहणाऱ्या ६ ते ७ तरुणांनी केलेल्या हल्ल्यात मकरंद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायाला व शरिरावर इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर झालेला हल्ला राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सूरज पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी केल्याची तक्रार मकरंद याने पोलिसांना केली आहे. त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्यात नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह संदीप पाटील, दीपक पाटील, प्रवीण पाटील, अरविंद पाटील, नृपेश पाटील, निशांत पाटील व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी सूरज पाटील व त्यांचा एक साथीदार अशा दोघांना अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी म्हात्रे याने कुकशेत गावात आमदार मंदा म्हात्रे यांचे लावलेले होर्डिंग अज्ञाताने फाडले होते. तर तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या आवारातील कौटुंबिक मंदिरावर देखील सिडको व पालिकेची संयुक्त कारवाई झालेली. यावरून म्हात्रे याने सदर प्रकारांचा निषेध सोशल मीडियावर व्यक्त केला होता. यामध्ये त्याने नगरसेवकालाही दोषी धरले होते. यामुळे आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे दिवसभर कुकशेत परिसरात तणावाचे वातावरण होते. तर घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये याकरिता परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. नगरसेवक सूरज पाटील यांच्यावर कारवाईला पोलीस विलंब करत असल्याच्या संशयाने मकरंद म्हात्रेच्या समर्थकांनी नेरुळ पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमवला होता. तर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रात्री नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. याप्रकरणी नगरसेवक सूरज पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)