शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये अवतरणार कॉर्पोरेट सिटी; थीम-बेस्ड आयकॉनिक सिटी धोरणांतर्गत पहिला प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: March 4, 2026 06:21 IST

-नारायण जाधव लाेकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबईला स्वतंत्र आर्थिक ओळख देण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा ...

-नारायण जाधवलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईला स्वतंत्र आर्थिक ओळख देण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा खारघर येथील आयसीपी अर्थात ‘इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क’ प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या ‘थीम-बेस्ड आयकॉनिक सिटी डेव्हलपमेंट’ धोरणांतर्गत सिडकोने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. यानुसार पुढच्या २० वर्षांत प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार आहे.

सुरुवातीला तब्बल ३०० हेक्टरहून अधिक जागेवर प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सुधारित आराखड्यानुसार आता १२० एकरांवर विकसित केला जाणार आहे. मात्र, आकार कमी झाला असला, तरी प्रकल्पाची व्यावसायिक क्षमता आणि धोरणात्मक महत्त्व अबाधित असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. यानुसार अधिकृतपणे निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी मुंबईत नवीन ‘बीकेसी’ घडवण्याचे लक्ष्यमुंबईतील बीकेसी अर्थात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सप्रमाणेच नवी मुंबईत एक जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र उभारण्याचा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे.आयटी-आयटीईएस, वित्तीय सेवा, बहुराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट मुख्यालयांसाठी एकात्मिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे हे केंद्र ‘कॉर्पोरेट सिटी’ म्हणून विकसित होणार आहे. हा प्रकल्प खारघर शहरासह महामुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे रोजगार संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कनेक्टिव्हिटी हे सर्वात मोठे बलस्थानउपनगरीय लोकल व खारघर परिसराला आधीच नवी मुंबई मेट्रोची जोड मिळालेली आहे. याशिवाय आता नवी मुंबईतील तुर्भे ते खारघरला जोडणाऱ्या पारसिक डोंगराखालील बोगद्याच्या कामाने वेग पकडला आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीएसारखे मोठे बंदर आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील टीटीसी वसाहतीतील आयटी पार्क, डेटा सेंटर्सचे जाळे जवळ असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट्ससाठी हा परिसर अत्यंत आकर्षक ठरणार आहे. शिवाय कर्नाळा-तळोजा लिंक रोडमुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि जेएनपीटीशी जलद संपर्क उपलब्ध होणार आहे.  

२० वर्षांचा विकास आराखडासिडकोने हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने २० वर्षांच्या कालावधीत विकसित करण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘नो कमेंट’, असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Corporate City to emerge in Kharghar; Iconic city project begins.

Web Summary : Kharghar's International Corporate Park, a theme-based iconic city project, is set for development. CIDCO's 120-acre project aims to create a world-class business hub like Mumbai's BKC with enhanced connectivity, boosting jobs and economic growth over the next 20 years.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई