शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :...अन् आठ दिवसांनी झालं नवजात लेकीचं दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:25 IST

coronavirus: कोरोना पॉजिटिव्ह असल्याने बाळाला तिच्यापासून लांब ठेवल्यांनतर आठ दिवसांनी घेतलेल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांनतर माय-लेकीची भेट झाली.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कोरोना पॉजिटिव्ह आल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेला मंगळवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सदर महिलेचा प्रसूतीकाळ जवळ आलेला असतानाच तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, तिला कोरोनावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता दुसऱ्याच दिवशी तिने मुलीला जन्म दिला. परंतु आई कोरोना पॉजिटिव्ह असल्याने बाळाला तिच्यापासून लांब ठेवल्यांनतर आठ दिवसांनी घेतलेल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांनतर माय-लेकीची भेट झाली.

घणसोली घरोंदा येथे राहणाऱ्या कोरोना पॉजिटिव्ह महिलेला 5 एप्रिलला कोरोनावर उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी ती नऊ महिन्याची गरोदर असल्याने तिचा प्रसूतीकाळजवळ आलेला होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राकेश म्हात्रे यांच्या पथकाने प्रसूतीची सर्व तयारी केली होती. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी या महिलेची प्रसूती झाली असता मुलीला जन्म दिला. 

कोरोना बाधित महिलेच्या प्रसूतीची राज्यातील ही दुसरी घटना असल्याने पालिकेकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. तर नवजात मुलीची देखील चाचणी केली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु महिला कोरोना पॉजिटिव्ह असल्याने नवजात मुलीला आईपासून दूर ठेवण्यात आले होते. यादरम्यान महिलेचे पती देखील होम क्वारंटाइन होते. त्यामुळे पालिकेचे डॉक्टरच या माय-लेकीची विशेष काळजी घेत होते. या महिलेवर कोरोनाचा उपचार केल्यांनतर 14 एप्रिलला तिच्या दोन चाचणी घेण्यात आल्या. दोन्हीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आठ दिवसांनी या माय-लेकीची भेट झाली. 

त्यांनतर मंगळवारी या महिलेला नवजात बालिकेसह घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका यांनी देखील टाळ्या वाजवत त्यांना घरी पाठवले.  तर  सोसायटी आवारात रुग्णवाहितेतून या महिलेचे मुलीसह आगमन होताच सामाजिक कार्यकर्ते आत्माराम सणस व परिसरातील नागसरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी देखील काढण्यात आली होती.  त्याद्वारे  पती पत्नी व त्यांचे नवजात बालक सुरखरूप परतल्याचा आनंदही परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून दाखविला. 

याच परिसरात राहणाऱ्या एका पोलिसालाही कोरोना झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी समोर आली आहे. परंतु सदर पोलीस कर्मचारी अनेक दिवसांपासून घरी परतलेला नव्हता. त्यानंतरही नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाही कोरोनातून बरी होऊन आलेल्या या महिलेच्या स्वागताला सोसायटी मधील नागरिकांनी उत्साह दाखवून कोरोनावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई