शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
5
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
6
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
7
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
8
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
9
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
10
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
11
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
12
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
13
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
14
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
15
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
16
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
17
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
18
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
19
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
20
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?

CoronaVirus News: चिंताजनक! सहा दिवसांपूर्वी मुलगा, आज वडील; एपीएमसीमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:15 IST

१८ दिवसांमध्ये घरातील तिघांचं निधन; एपीएमसीमध्ये हळहळ व्यक्त

नवी मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व्यापाऱ्याचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. सहा दिवसापूर्वी 23 मे रोजी त्यांच्या 27 वर्षांच्या मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 12 मेला वडिलांचेही वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 18 दिवसामध्ये एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे बाजारसमितीमधील सर्वांनाच धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. नेरूळमध्ये वास्तव्यास असलेल्या या कुटुंबियांचा अनेक वर्षापासून एपीएमसीमध्ये व्यापार आहे. शुक्रवारी निधन झालेले व्यापारी व त्यांची दोन मुले व्यापारामध्ये असून दिवसरात्र परिश्रम करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊनच्या काळातच त्यांच्या वडिलांचे 12 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कोरोनामुळे अनेक नातेवाईक व परिचितांना अंत्यविधीसाठीही पोहोचता आले नाही.वडिलांच्या मृत्यूचे दु:ख असतानाच व्यापारी व त्यांच्या 27 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना 23 मे रोजी मुलाचे निधन झाले. एपीएमसीमधील सर्वात तरूण व्यवसायिकाचे निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.वडील व मुलाच्या मृत्यूनंतर व्यापारीही रूग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते. अखेर 29 मे रोजी दुपारी उपचारादरम्यान व्यापाऱ्याचाही मृत्यू झाला. एकाच घरातील तिघांचा 18 दिवसांमध्ये मृत्यू झाल्यामुळे बाजार समितीमधील सर्वानाच धक्का बसला आहे. तिघांपैकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाजारसमितीमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाजारसमितीचे अनेक कर्मचारी, सुरक्षा रक्षक, व्यापारी, कामगार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन व्यापारी प्रतिनिधींनीही केले आहे.देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणीहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेशकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यातमराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस