शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

CoronaVirus News: पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; मृत्युदरही घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:57 IST

महापालिकेच्या सकारात्मक प्रयत्नांना यश

- वैभव गायकर पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा वाढता आकडा सर्वांसाठी चिंतेची बाब बनला आहे. असे असले, तरी या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही बाब पालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाल्याने पनवेलकारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, कोविडने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांची केंद्र सरकारची टक्केवारी ३.९ टक्के आहे, तर राज्याची टक्केवारी ३.७ आहे. त्या तुलनेत पनवेल पालिका क्षेत्रात हा मृत्युदर २.४ टक्के असल्याचे दिसून आले आहे.पालिका क्षेत्रात ८,२२७ रुग्ण आहेत. यापैकी ६,६१९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला केवळ १,६११ बाधित रुग्ण आहेत. कामोठे शहरात कोरोनाचे सर्वाधिक १,७७५ रुग्ण आहेत, तर तळोजामध्ये सर्वात कमी म्हणजेच ५०० रुग्ण आहेत. आजवर पालिका क्षेत्रात १९७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पनवेल शहरात २६ सध्या रुग्ण आहेत, तर सर्वाधिक ४०१ रुग्ण कळंबोलीमध्ये आहेत. पालिकेने कोविडच्या टेस्टिंग वाढविल्याने कोविडच्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळत आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अँटिजेन टेस्टमुळे तत्काळ कोविड डिटेक्ट होत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग कोविडच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. खासगी डॉक्टरांनाही कोविडच्या रुग्णांवर घरोघरी जाऊन उपचार करण्याची परवानगी दिल्याचे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. जास्तीतजास्त कोविड रुग्णांना उपचार मिळावे, याकरिता खासगी कोविड रुग्णालयांची संख्याही ११ वरून १४ केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पालिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय पनवेल, कामोठे येथील एमजीएम रुग्णालय आदी ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधितांना लवकरात लवकर उपचार मिळत आहे. डॉक्टरांना घरोघरी जाऊन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रातील मृत्युदर नियंत्रणात आहे.- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिकादेवांशी इन, इंडिया बुल्स, रोडपाली येथील पोलीस मुख्यालय आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. खासगी रुग्णालयात उपचारासाठी प्रत्येक रुग्णालयात शिल्लक खाटांची माहिती जाहीर करण्याची मागणी मनसे, तसेच नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार, दररोज पालिका क्षेत्रातील उपलब्ध खाटांची माहिती जाहीर केली जाते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या