शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अर्धवट उपचार करून रुग्णाला पाठविले घरी, रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 23:40 IST

लाखाच्या घरात बिल आकारूनही खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या हेळसांडप्रकरणी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.

नवी मुंबई : कोरोना झालेल्या रुग्णावर अर्धवट उपचार करून घरी पाठविल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. दरम्यान, प्रकृती खालावल्याने रुग्णाने पुन्हा चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. लाखाच्या घरात बिल आकारूनही खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या हेळसांडप्रकरणी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.वाशीतील फोर्टीज कोरोनावर उपचारासाठी एक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली होती. काही दिवसांनी त्यांना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगून घरी पाठविण्यात आले. दरम्यान, उपचाराचे १ लाख २५ हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले, परंतु डिस्चार्ज दिल्यानंतर प्रकृतीमध्ये सुधार नसल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये पुन्हा चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यावरून केवळ बिलाची रक्कम आकारण्याची रुग्णालयात ठरावीक कालावधीसाठी दाखल करून घेतले जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु कोरोनाबाधित असतानाही उपचारानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगून रुग्णांना घरी पाठविले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाच्या नावाखाली अद्यापही लूट सुरूच असल्याचा प्रकार समोर येत आहेत.मनसेचे आयुक्तांना निवेदनसदर रुग्णाने या घटनेची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना कळवली असता, त्यांनी रुग्णालय फोर्टीज रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरले, तसेच या रुग्णालयावर रुग्णासोबत केलेली हेळसांड व महामारी पसरविण्यास कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई