शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

coronavirus: नवी मुंबईत एक लाख ४१ हजारांचा दंड वसूल, बेलापूर विभागातून सर्वाधिक ३९ हजार रुपयांची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 00:44 IST

महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ लाख ४१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.प्रत्येक नोडमध्ये कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सर्वाधिक ३९ हजार रुपये दंड बेलापूर विभागातून वसूल केला आहे. घणसोली व ऐरोलीमधून प्रत्येकी ३८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.पनवेलमध्ये ७,२४३ जणांवर कारवाईपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ३ ते १३ जुलैदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाºया ७,२४३ जणांवर पनवेलमध्ये सात दिवसांत ही कारवाई कारण्यात आली आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महाराष्ट्र मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सुमारे ३,८५४ केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, असे परिमंडळ २चे उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त पालिका हद्दीतही पनवेल महानगरपालिका प्रशासनाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ३३ हजारांचा दंड पालिकेने वसूल केला.यांच्यावर बसला वचकअनावश्यक बाहेर फिरणे-६४१, मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे- ४२६, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- १५, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर फिरणे- १,६०४, मॉर्निंग वॉक- २४९, दुकाने वेळेत बंद न करणे- १०१, आरोग्यविषयक खबरदारी न घेता दुकाने सुरू ठेवणे- २५, पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमणे- १, जास्त प्रवासी वाहतूक- २३६.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई