शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: परिचारिका ठरताहेत खऱ्या कोविड योद्ध्या, पनवेल, नवी मुंबईत शेकडो जणी सक्रिय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 01:25 IST

पनवेलसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविडने थैमान घातले असून रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांच्या बरोबरीने आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात परिचारिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

- वैभव गायकर पनवेल : माणूस अंथरुणावर खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. अशा वेळी रक्ताचे नाते नसताना, साधी ओळखही नसताना रुग्णालयात आपुलकीने चौकशी करते, औषधोपचार करते, मानसिक आधारही ‘ती’च देते. अशा शेकडो परिचारिका सध्या कोरोनाविरोधात घरदार विसरून एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत.पनवेलसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविडने थैमान घातले असून रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांच्या बरोबरीने आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात परिचारिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे.सध्याच्या घडीला पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय पनवेल व कामोठेतील एमजीएम रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पनवेल परिसरातील रुग्णसंख्येने २०० चा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईतील संख्या ७०० च्या आसपास आहे. नवी मुंबई मनपा रुग्णालयात कोविडबाधितांवर उपचार केले जात आहेत. याव्यतिरिक्त बाल माता रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रातही परिचारिका कार्यान्वित आहेत. पनवेलमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेल्या रुग्णालयात ५० तर एमजीएम रुग्णालयात १०० च्या आसपास परिचारिका कार्यान्वित आहेत. नवी मुंबई मनपा रुग्णालयात परिचारिकांची संख्या जवळपास ६०० च्या घरात आहे. यामध्ये १५२ एएनएम परिचारिका आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कुटुंब आणि रुग्णांची सेवा अशी कसरत सध्या परिचारिकांना करावी लागत आहे. अनेक परिचारिका स्वत: कोरोनाने बाधित होत आहेत. पनवेलमधील जिल्हा कोविड रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या परिचारिकांची व्यवस्था शहरातील बीपी मरिन अ‍ॅकॅडमीत केली आहे. औषधोपचारासह रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे, सकारात्मकता निर्माण करण्याचे कामही या परिचारिका चोखपणे बजावत आहेत.आरोग्य सेवा देणारे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. आमच्या अनेक सहकाऱ्यांनाही बाधा झाली आहे. कोरोनाची लढाई नक्कीच जिंकू, असा विश्वास आहे.- मिता गावडे, परिचारिका, नवी मुंबईमहिनाभरापासून कुटुंबापासून दूर आहे. सध्या रुग्णसेवेला प्राधान्य देत आहोत. कोविडविरुद्धच्या लढाई सर्व सहकारी मनोभावे पाडणारच.- ज्योती गुरव, परिचारिका, जिल्हा कोविड रुग्णालय, पनवेल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीयNavi Mumbaiनवी मुंबई