शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 06:58 IST

नवी मुंबईत आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेसह खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागामध्ये बेड उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर व आॅक्सिजन युनिटची कमतरता निर्माण झाली असून, वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कोपरी गावामधील सामाजिक कार्यकर्ते परशुराम ठाकूर यांचा  आरोग्य विभागामधील डॉक्टरांबरोबरच्या संवादाची क्लिप शहरभर व्हायरल होत आहे. ठाकूर यांच्या नातेवाइकांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्काळ कोविड चाचणी करण्यात आली. आयसीयूची गरज असल्याने त्यांनी अनेक रुग्णालयांत चाचपणी केली, परंतु आयसीयूमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. कोपरखैरणेतील एका रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करून घेतले, परंतु कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इतर ठिकाणी हलवावे लागेल, असे सांगितले होते. कारण संबंधित रुग्णालयास कोविड रुग्णांवर उपचार करण्याचा परवाना नव्हता. बुधवारी दुपारी संबंधित रुग्णाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर ३२ रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तुमच्या रुग्णाचा विचार केला जाईल, तोपर्यंत त्यांना घरी घेऊन जा, असे सांगण्यात आले. पैसे भरून खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची तयारी दर्शवूनही जागा उपलब्ध झाली नाही. अखेर काही तासांनी वाशीतील एका खासगी रुग्णालयात जागा उपलब्ध झाली.  यानंतर, नवी मुंबईमध्ये गरीबच नाही, तर रुग्णालयात आयसीयू युनिट नसल्याने श्रीमंतांनाही उपचाराविना मरावे लागणार असल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने संकेतस्थळावर कोरोना रुग्णांसाठी ६,८४२ बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ४,२०१, कोविड हेल्थ सेंटरमध्ये १,७३५ व डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये ९०६ बेड असल्याचे सांगितले आहे. तीनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये भरपूर जागा असल्याचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात एकाही रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये जागा उपलब्ध होत नाही. कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठीही मोजकीच रुग्णालये उपलब्ध असून, तेथेही आयसीयू युनिट उपलब्ध  होत नाहीत. व्हेंटिलेटरची संख्याही मर्यादित आहे. मनपाच्या वाशी रुग्णालयामध्ये अनेकांना व्हेंटिलेटरचा वापर करता येत नाही. यामुळे योग्य उपचार मिळत नसल्याने मृत्युदर वाढत आहे. मनपा प्रशासन अतिरिक्त आयसीयू युनिट, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणार असल्याची घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात रुग्णांना वेळेत उपचारही मिळत नाहीत.आयसीयूची एकत्रित माहिती हवीमहानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर कोविड डॅशबोर्ड दिलेला आहे. त्यावर रुग्णालय व तेथे उपलब्ध बेडची संख्या दर्शविलेली आहे, परंतु आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची माहिती दिलेली नाही.नॉन कोविड रुग्णांसाठी पालिकेची व खासगी रुग्णालयातील बेड्सची संख्या, आयसीयू विभागातील बेड्सची संख्या याविषयी तपशीलही महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही.अशा प्रकारे तपशील उपलब्ध करून तो मनपाच्या संकेतस्थळावर नियमित देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.महानगरपालिकेचा दावा6842 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध4201 कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध1735 कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपलब्ध906 डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये उपलब्धनवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर कोरोना रुग्णांसाठी तीनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये भरपूर जागा असल्याचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात एकाही रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये जागा उपलब्ध होत नाही.सर्वसामान्यांची धाव लोकप्रतिनिधींकडेनवी मुंबईमधील कोरोना किंवा इतर आजार झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनाही कित्येक तास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे नाईलाजाने सर्वसामान्य नागरिकांना माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी संपर्क करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात असल्याचे चित्र आहे.रुग्णालयात दाखल करून घेण्यास विलंब झाला किंवा आयसीयू उपलब्ध झाला नाही, याविषयी अधिकृत तक्रार आलेली नाही. रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आॅक्सिजन व व्हेंटिलेटरविषयी नागरिकांमध्येही काही गैरसमज आहेत, तेही दूर केले जातील. मनपा व खासगी रुग्णालयातील आयसीयू बेडविषयीही माहितीही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.- अण्णासाहेब मिसाळ,आयुक्त, महानगरपालिकानातेवाइकांना कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात वेळेत दाखल करता आले नाही, असा अत्यंत वाईट अनुभव आला असून, नवी मुंबईमध्ये गरीबच नाही, तर श्रीमंतही उपचाराशिवाय मरेल, अशी स्थिती आहे. ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर परिस्थिती अजून हाताबाहेर जाऊ शकते.- परशुराम ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटलNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका