शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus News : अभिजीत मिळविणार का कोरोनावर जीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:21 IST

आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समवेश झाला आहे. कोरोनाचा आकडा ५,०७२ झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती केली आहे. आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.नवी मुंबईला कोरोनाचा विळखा पडला असताना, विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे. १३ मार्चपासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. तीन महिन्यांत वाशीमध्ये १,२०० बेडचे नवीन रुग्णालय उभारण्यात आले. चारस्तरीय यंत्रणा उभारण्यात आली. विविध उपाययोजना राबविण्यात आल्या, परंतु दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच राहिली. २३ जूनला १११ रुग्ण वाढले असून, एकूण रुणांनी पाच हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण रुग्णसंख्या ५,०७२ झाली असताना, महानगरपालिकेचे तेविसावे आयुक्त म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये प्रतिदिन रुग्ण वाढत आहेत. तुर्भे विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९५६ झाली असून, लवकरच हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरामध्येही रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. झोपडपट्टी, अल्प उत्पन्न गटातील चाळी व गावठाण परिसरामध्ये दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नवीन आयुक्तांना कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहेत. त्याहीपेक्षा कोरोना व्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. येथील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. नवी मुंबईमधील गरीब रुग्णांसाठी मनपाचे जनरल रुग्णालय सुरू करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरामध्ये रुग्णांची संख्या कमी करणे तितकेच गरजेचे बनले आहे.>कठोर उपाययोजनांची गरज : शहरात कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. मंगळवारी एका दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे, आॅक्सिजन बेडचे प्रमाण वाढविणे व तपासणीसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्त कसे पेलणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.>मनपाच्या स्थापनेपासून आयुक्तांचा तपशीलआर. सी. सिन्हाराजीव आग्रवालशंकर मेननआर. सी. सिन्हाएम. रमेशकुमारजी. बी. पिंगुळकरजी. एस. गिलजे. एम. फाटकएस.एल. कुलकर्णीसुभाषचंद्र भाकरेपी. एस. मीनामुकेश खुल्लरसुनील सोनीरमेश उबाळेमधुकर कोकाटेविजय नाहटाभास्कर वानखेडेए. एल. जºहाडदिनेश वाघमारेतुकाराम मुंढेडॉ. रामस्वामी एन.अण्णासाहेब मिसाळअभिजीत बांगर>नवी मुंबईमधील परिस्थितीएकूण चाचणी १७६०४निगेटिव्ह ११,६४३रुग्ण संख्या ५,०७२कोरोनामुक्त ३,००१उपचार सुरू १,८९४एकूण मृत्यू १७७होम क्वारंटाईन ११,३०४क्वारंटाईन पूण ३९,४३१

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या