शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नवी मुंबईत पुरुषांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 00:08 IST

कोरोना रुग्णांची संख्या ६१.३८ टक्के; महिलांचे प्रमाण ३८.६१ टक्के

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पुरुषांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण रुग्णांमध्ये ६१.३८ पुरुष व ३८.६१ महिलांचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्येही पुरुषांची संख्या जास्त आहे.नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या ३८ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. प्रति दिन ३०० ते ४०० जणांना कोरोनाची लागण होत आहे. नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत ३८,४६८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये २३,६१३ पुरुष व १४,८५३ महिलांचा समावेश आहे. पुरुषांची टक्केवारी ६१.३८ व महिलांचे प्रमाण ३८.६१ असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरुषांचे प्रमाण जास्त असण्यास विविध कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व एमआयडीसीमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडल्यामुळे पुरुषांना लवकर लागण होत आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाºयांमध्येही त्यांचा समावेश आहे. मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर पडून एकत्र गप्पा मारणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे या सर्वांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे. महानगरपालिका व एपीएमसीसह पोलिसांनीही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईमध्ये पुरुषांचेच प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शासन व प्रशासनाने केलेल्या आवाहनाप्रमाणे महिलांकडून नियमांचे पालन होत असल्याने त्यांना लागण होण्याचे प्रमाण कमी आहे.तरुणांकडून उल्लंघन : नवी मुंबईत पुरुषांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्येही तरुणांची संख्या जास्त आहे. २० ते ४० वर्षे वयोगटांमधील अनेक तरुण नियमांचे पालन करत नाहीत. मित्र व सहकाºयांसोबत एकत्र गप्पा मारत बसणे. मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही त्यांच्यामध्ये जास्त आहे. तरुणांमध्ये वाढणारा प्रादुर्भाव सर्वाधिक चिंतेची गोष्ट असल्याचे मानले जात आहे.एपीएमसीमध्ये सर्वाधिक धोका : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये पुरुष कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. माथाडी कामगार, वाहतूकदार, व्यापारी, त्यांच्याकडील कर्मचारी, खरेदीदार या सर्वांमध्ये पुरुष कर्मचाºयांचे प्रमाण जास्त असून, मार्केटमध्ये प्रतिदिन ५० ते ६० हजार नागरिकांची ये-जा असते.पालिका व एपीएमसी प्रशासनाने मार्केटमध्ये जनजागृती केली असली, तरी कामगारांनी व इतर सर्वांनीच नियम पाळणे गरजेचे आहे.कोरोना रुग्णांचा तपशीलविभाग महिला पुरुष एकूणऐरोली २१५६ ३१७० ५३२६बेलापूर २१५२ ३४१३ ५५६५दिघा ४१७ ७३७ ११५४घणसोली १७९२ ३०५० ४८४२कोपरखैरणे २१६१ ३७६६ ५९२७नेरुळ २६९८ ४१२६ ६८२५तुर्भे १७२४ २७८५ ४५०९वाशी १७५३ २५६६ ४३२०एकूण १४८५३ २३६१३ ३८४६८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या