शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

CoronaVirus News: शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 1:34 AM

आयसीयूमध्ये जागा नाही : ४२४८ खाटांची सुविधा; आरोग्य विभागावरील ताण वाढला

- नामदेव मोरेनवी मुंबई : शहरामध्ये कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये ४२४८ रुग्णखाटा उपलब्ध असून सक्रिय रुग्णांची संख्या १०४४५ झाली आहे. आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. आयसीयू युनिट वाढविण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. हॉस्टेल, मनपा शाळांचेही कोरोना उपचार केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट घातक ठरली आहे. १ मार्चपासून ३८ दिवसांमध्ये तब्बल १८३६७ नवीन रुग्ण वाढले आहेत. प्रतिदिन एक हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढत असून त्यांना उपचार मिळवून देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील जवळपास सर्व रुग्णालयांमधील आयसीयू युनिट फुल्ल झाली आहेत. आयसीयूमध्ये जागा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना उपचार कसे मिळवून द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते व महापालिकेच्या आरोग्य विभागालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकूण रुग्णांपैकी जवळपास ७ हजार रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. अशीच स्थिती राहिली तर मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वत: सर्व खासगी रुग्णालयांशी संवाद साधून आयसीयू युनिट वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात प्रतिदिन १० ते १५ आयसीयू युनिट वाढविले जात आहेत. तेरणामध्ये १०, रिलायन्समध्ये १०, अपोलोमध्ये १३, इंद्रावतीमध्ये १२ आयसीयू बेड वाढविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. याशिवाय जनरल बेड वाढविण्यासही प्राधान्य दिले जात आहे. अचानक रुग्णांची संख्या वाढल्यामुळे सर्वांना उपचार मिळवून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महानगरपालिकेने नवीन केंद्र सुरू करण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. वाशीतील प्रदर्शन केंद्र, खारघरमधील दोन हॉस्टेलमध्ये केंद्र सुरू केले जाणार असून इंडिया बूलमध्ये १ हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.शाळांमध्ये नवीन कोरोना केंद्रमहानगरपालिकेने शहरात नवीन कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेच्या चार शाळांमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. दाेन हॉस्टेलमध्ये ४०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे. नवी मुंबईमध्ये सर्व रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. आयसीयू युनिट वाढविण्यात येत आहेत. मनपा व खासगी रुग्णालयांमधील बेडची क्षमता वाढविली जात असून नवीन केंद्रही सुरू केली जात आहेत. मनपा शाळा, खारघरमधील हॉस्टेलमध्येही नवीन केंद्र सुरू केली जात आहेत.- अभिजित बांगर,आयुक्त 

रुग्णालयनिहाय बेडरुग्णालय    एकूण    शिल्लक एमजीएम सानपाडा     ७५    १राधास्वामी सत्संग भवन     ३६३    ५२ओजस                          १४      ०क्रिटीकेअर                 २२      ०ग्लोबल                         २१      ०डिवाईन                         ३५    ६श्री हॉस्पिटल                 २०    ०साई सेवा हॉस्पिटल          २०    ०क्रिडेन्स                         ११    ११सिडको वाशी                 ४०७   १५३रिलायन्स आयटी पार्क     १००     ६ईटीसी वाशी                 २००    ३३निर्यात भवन एपीएमसी     ३१२    ४स्वामी विवेकानंद सेंटर     १०८    १५ऐराली समाजमंदिर            ९०    ९०आगरी कोळी भवन            ६०    ६०रुग्णालयनिहाय बेडरुग्णालय    एकूण    शिल्लकतेरणा                 ९५    २            फोर्टीज                 ८५    ०रिलायन्स                 ११०    ०एमजीएम सीबीडी     ६६     ०एमपीसीटी                 ८३     ०अपोलो                 १६०   १पीकेसी                 ४४    ५इंद्रावती                 ९०     ०सनशाईन                 ३३     २डी.वाय. पाटील     ४००   २०३सिडको प्रदर्शन केंद्र     ७०२   १७४हेरीटेज ऐरोली                 १०    १न्यू मिलेनीयम                 २०    ०न्यू मानक                 ४०     ४लक्ष्मी घणसोली              १५     ०फ्रीझन                          १९     ०व्हीनस                          १२      ३निर्मल कोपरखैरणे            १३        ०राजपाल                 २१      ०सिद्धीका कोपरखैरणे     ५        ०एमजीएम वाशी                १०५    ०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या