शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 00:16 IST

CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे.

- वैभव गायकर

पनवेल : कोरोनाने समाजामध्ये एक प्रकारे मोठी दरी निर्माण केली आहे. संसर्गामुळे जवळचे नातेवाईकही यामुळे दुरावले असून सध्याच्या घडीला या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे नातेवाईकही बेहाल झाले आहेत. दवाखान्यात दाखल केलेल्या रुग्णांची देखरेख व्यवस्थित होत आहे की नाही, याबाबतही नातेवाइकांना योग्यरीत्या माहिती मिळत नसून, नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर रात्र घालवावी लागते.पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे. विशेष म्हणजे आजच्या घडीला सुमारे ४४५० विद्यमान रुग्ण पालिका क्षेत्रात आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांचे बहुतांश नातेवाईक क्वारंटाईन आहेत; तर या रुग्णांची माहिती घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर दिवस काढावे लागत आहेत. 

नातेवाइकांकडे जाता येत नाही अन‌् ....कोरोना झाल्यावर घरातील क्वारंटाईन सदस्यांना घरातून बाहेर जाता येत नाही. त्यामुळे नातेवाइकांचीही मदत घेता येत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात दुकानेही बंद असल्याने ज्या घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशा सदस्यांचे मोठे हाल सुरू आहेत. एखाद्या संस्थेने पुढाकार घेऊन क्वारंटाईन सदस्यांना अत्यावश्यक सेवेतील वस्तू पुरविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

घरातील दोन सदस्य पॉझिटिव्ह आल्याने आम्हाला घराबाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे कोणाकडे मदतीचा हात मागितला असता थेट नकार न देता मदतीसाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.     - आनंद मेश्राम 

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात गैरसमजही पसरले आहेत. आमचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर होता. इकडे आल्यावर प्रवासादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र आमच्या शेजाऱ्यांनी आमच्याशी बोलणे टाळले आहे.     - केदार रामघरात 

कोविड झाल्यावर आपण एखादा गुन्हा केल्याचा समाजाचा समज होत आहे. मदत तर सोडा; विचारपूस करायलादेखील कोणी पुढे येत नाही. कोरोनाबाबत समाजाची मानसिकता सुधारण्याची गरज आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो.     - किशोर सोनुने

टॅग्स :panvelपनवेलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस