शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVirus News: पाच महिन्यांत २,४९४ मृत्यू, इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 01:10 IST

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपेक्षा जास्त झाली असून, कोरोना बळींची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पाच महिन्यांमध्ये नवी मुंबईमध्ये २,४९४ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च ते ३१ जुलैदरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४१८ आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार व वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्यांची संख्या २,0७६ असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जबाजारी, आर्थिक चणचण व इतर मानसिक दबावामुळे हृदयविकाराचा झटका येऊनही अनेकांचा मृत्यू झाला आहे. इतर आजारांच्या रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपेक्षा जास्त झाली असून, कोरोना बळींची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. एकूण रु ग्णांपैकी अडीच टक्केरु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना बळींचा एकत्रिक आकडा जास्त वाटत असला, तरी प्रत्यक्षात मात्र इतर आजार व नैसर्गिक मृत्यू झालेल्यांच्या तुलनेमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान पाच महिन्यांमध्ये नवी मुंबईमध्ये जवळपास २,४९४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद विभाग कार्यालयामध्ये झाली आहे. यामध्ये बेलापूर विभागात ३९८, नेरु ळ विभागात ३६१, वाशी ९४७, तुर्भे १५८, कोपरखैरणे ३१५, घणसोली १३५ व ऐरोलीसह दिघा परिसरात १८0 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पाच महिन्यांमध्ये कोरोनामुळे शहरातील ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त २,0७६ जणांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल व इतर ठिकाणावरून नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कोरोनारु ग्णांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पाच महिने अनेक व्यवसाय बंद होेते. रोजगार ठप्प झाल्यामुळे अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. आर्थिक चणचण भासू लागली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीही पुरेसा पैसा अनेकांकडे नाही. यामुळे अनेकांचा मानसिक ताण वाढला आहे. यामुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका आहे. काहींनी आत्महत्याही केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक खासगी रु ग्णालयांनी दवाखाने बंद केले. यामुळे गंभीर आजारी असणाऱ्यांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.महानगरपालिका प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच त्या व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सक्षमकरावी, अशी मागणी होऊ लागली आहे.>शहरातील नॉन कोविड रु ग्णालयात ज्या सुविधा कमी पडत आहेत, त्याबाबत वारंवार मागणी केली जात आहे. त्या अनुषंगाने सध्या जी नॉन कोविड रु ग्णालये सुरू आहेत, ती पूर्ण क्षमतेने सुरू करणे आणि जी नॉन कोविड रु ग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू नसतील, ती त्यांच्यामध्ये पुन्हा बदल करण्याचा आपल्याकडे पर्याय आहे. त्या पद्धतीने काम सुरू आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आपल्याकडे सुविधा किती आहेत आणि अतिरिक्त कुठल्या बनणार आहेत, त्या आधारावर एखादे कोविड रुग्णालय नॉन कोविड करण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका>कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, ते मानसिक दबावाखाली आहेत. कोरोनाची लागण झाली, तर आपण एकटे पडू का? आपल्याला मदत आणि योग्य उपचार मिळतील का? मृत्यू तर होणार नाही ना? असे अनेक विचार नागरिकांच्या मनात घर करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही तणावाखाली राहू नये. आता उपचाराच्या सुविधा वाढल्या असून, रु ग्णालयांमधील कामाची गतीही वाढली आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची लक्षणे असल्यास किंवा इतर कोणत्याही आजाराचे उपचार करण्यासाठी रु ग्णालयात गेले पाहिजे. आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ>भिकाºयांचाही मृत्यू : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर भिकारी व निराधार व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्याने, त्यांची उपासमार होत होती. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी एकत्रित आकडा उपलब्ध नसला, तरी एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास पाच निराधारांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस