शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

coronavirus: नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये तरुणांनाच सर्वाधिक लागण, खबरदारी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 01:37 IST

कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य घबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 - नामदेव मोरे नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनाने एक हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे. नवी मुंबई महापालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचे ५०% रुग्ण २० ते ४० वयोगटातील असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य घबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्यांच्या परिसरात ११ मेपर्यंत १०७८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी परिमंडळ एकमध्ये ७९७ व परिमंडळ दोनमध्ये २८१ रुग्णांचा समावेश आहे. कोपरखैरणे पोलीस ठाणे परिसरात सर्वाधिक १६९ रुग्ण आढळले आहेत. कोपरखैरणेसह वाशी, रबाळे व नेरूळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे.तरुणांमध्ये लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. २० ते ४० वयोगटातील ५१२ जणांना प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा वर्षापर्यंतच्या ६७ जणांना याची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ५० ते ६० वयोगटातील १४ जणांचा समावेश आहे.नवी मुंबई, पनवेल परिसरात अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी व इतर नागरिकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे जवळपास २०० पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. मुंबईमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी जाणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, बेस्टचे चालक, भाजी व ग्रोसरी दुकानदार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आल्याने इतरांना प्रादुर्भाव झाला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य खबरदारी घेतली तर कोरोनापासून स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव करणे शक्य आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणाशीही जास्त संपर्क ठेवू नये. स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.कोरोनाशी लढण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महापालिका, रायगड जिल्हा प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत आहे. नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी २४ तास कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनीही योग्य काळजी घेतल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल.- संजय कुमार,पोलीस आयुक्त,नवी मुंबईकोपरखैरणे १६९रबाळे १२२नेरूळ ११६वाशी १०३एपीएमसी ७६रबाळे एमआयडीसी ४०सानपाडा ४८तुर्भे ४४सीबीडी ३एनआरआय ४९पनवेल ३०पनवेल तालुका ३कळंबोली २९

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई