शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 23:59 IST

मुंबईबाहेरील सर्वात मोठी प्रयोगशाळा : चोवीस तास तपासण्यांचे काम सुरू

नामदेव मोरे 

नवी मुंबई : एमएमआरडीए परिसरात मुंबईबाहेरील सर्वात मोठी कोरोना चाचणी प्रयोगशाळा नवी मुंबईत सुरू करण्यात आली आहे. २४ तास तपासण्यांचे काम सुरू असून, आतापर्यंत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. महानगरपालिकेने स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केल्यामुळे, चाचण्यांसाठी होणारा विलंब थांबला आहे. वेळेत उपचार होत असल्यामुळे मृत्युदर नियंत्रणात आणणेही शक्य झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने नेरुळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा ४ आॅगस्टला सुरू केली आहे. प्रतिदिन एक हजार चाचण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळेत आहे. मुंबई बाहेर एमएमआरडीए परिसरात एवढी क्षमता असलेली दुसरी प्रयोगशाळा नाही. वीस दिवसांत येथे दहा हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. ही प्रयोगशाळा सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेला शासनाने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीसाठी पाठवावा लागत होता. या चाचण्यांसाठी खूपच वेळ लागत होता. पाच ते दहा दिवस काही रुग्णांचे अहवाल १५ दिवसांनंतर मिळाले होते. काही रुग्णांचा अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाला होता. अभिजीत बांगर यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यासाठी आवश्यक आयसीएमआर ची परवानगी मिळवण्यात आली. प्रयोगशाळेसाठी नेरुळ रुग्णालयात जागा निश्चित करण्यात आली. दर्जेदार साहित्य खरेदी व कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली. ११ दिवसांत प्रयोगशाळेची निर्मिती करून ती प्रत्यक्षात सुरू करण्यात आली.

महानगरपालिकेच्या आरटीपीसीआर लॅबमध्ये ४ मायक्रोबायोलॉजिस्ट, २0 तंत्रज्ञ व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. चोवीस तास लॅब सुरू ठेवण्यात आली येत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ८00 ते ८५0 चाचण्या केल्या जात आहेत. २४ तासांत अहवाल उपलब्ध करून दिला जात असल्यामुळे, रुग्णावर तत्काळ उपचार सुरू करणे शक्य होऊ लागले आहे. यामुळे प्रलंबित अहवालांचे प्रमाण कमी झाले आहे. विलंब थांबल्याने रुग्ण लवकर बरा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६0 वरून ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्यूचे प्रमाण ३.५ वरून २.२५ टक्के इतके झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही या प्रयोगशाळेचा लेप्टोस्पायरसेस, स्वाइन फ्लू व एचआयव्ही चाचण्यांसाठी उपयोग होणार आहे.ब्रेक द चेन मोहिमेस चालनानवी मुंबई महानगरपालिकेने मिशन ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीची व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची अँटिजेन चाचणी केली जात आहे. अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली, परंतु संबंधित व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत असल्यास तत्काळ आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. यामुळेच मागील काही दिवसांत रुग्णवाढीचा दर कमी होऊ लागला आहे. मनपाच्या प्रयोगशाळेचा यामध्ये मोठा वाटा आहे.खासगी प्रयोगशाळांकडून होणारी लूट थांबलीनवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा नसल्याने स्वॅब तपासणीसाठी मुंबईमधील शासननियुक्त लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. तेथे इतर मनपातील स्वॅबही येत असल्याने, ५ ते १0 दिवस अहवाल मिळत नव्हता. यामुळे नागरिक खासगी लॅबमधून तपासणी करून घेत. सुरुवातीला यासाठी २,८00 रुपये व नंतर काही ठिकाणी ५ ते ७ हजार रुपये वसूल केले जात होते. मनपाने ही सुविधा मोफत सुरू केल्यामुळे नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका