शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मुंबई-ठाण्याने वाढवली नवी मुंबईची चिंता, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 01:33 IST

Coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुंबई शेजारील शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, नागरिकांना सुरक्षा नियमांचा विसर पडल्याने नवी मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, पुन्हा एकदा शहराची चिंता वाढली आहे.नवी मुंबईत गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, बाधितांची संख्या रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची निर्मिती केली आहे. परंतु शहरात कामानिमित्त येणारे तसेच शहरातून कामानिमित्त इतर ठिकाणी जाणारे नागरिक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, आदी बाबी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ, विविध आयटी कंपन्या, आदी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे कामानिमित्त मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील अनेक ठिकाणचे नागरिक दररोज नवी मुंबई शहरात येतात. तसेच कामानिमित्त शहरातील नागरिक  इतर शहरांमध्ये जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून, नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. कामानिमित्त ये-जा करण्यासाठी बेस्ट बस, एनएमएमटी, एसटी, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, आदी प्रवासी वाहनांचा वापर केला जात असून, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून  नागरिकांची होणारी गर्दी, सुरक्षा नियमांचा पडलेला विसर यामुळेच रुग्णसंख्येत भर पडली आहे. बाहेरून आलेल्यांची चाचणी नाही नवी मुंबई शहरात शेजारील इतर शहरांतून तसेच राज्यातील विविध भागांतून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करतात. शहरातील प्रमुख बस स्टॉपवर कोविड चाचणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरातील काही रेल्वे स्थानकांवर महापालिकेच्या माध्यमातून कोविड चाचण्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी चाचणी करण्याची प्रवाशांना किंवा नागरिकांना कोणतीही सक्ती करण्यात येत नाही. एपीएमसी बाजरपेठेत दररोज लाखो नागरिक ये-जा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोविड टेस्ट सेंटरदेखील उभारण्यात आले आहे; परंतु या ठिकाणी देखील चाचणी करण्याची सक्ती नसल्याने अनेक नागरिक चाचणी न करताच ये-जा करतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई