शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

CoronaVirus Lockdown : नवी मुंबईकर झाले कडकडीत ‘लॉक’, दिघा ते बेलापूरपर्यंत शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 06:41 IST

नवी मुंबईमध्ये प्रतिदिन सरासरी १ हजार रुग्ण वाढू लागले आहेत. सरासरी चार जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत.

नवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांचे शनिवारी नवी मुंबईकरांनी काटेकोरपणे पालन केले. दिघा ते बेलापूरदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद होती. शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. महानगरपालिका व पोलिसांचे पथक शहरभर फिरून नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. पामबीच रोड, ठाणे-बेलापूर रस्ता व सायन - पनवेल महामार्गावरही वाहनांची संख्या कमी झाल्याचे चित्र होते.             नवी मुंबईमध्ये प्रतिदिन सरासरी १ हजार रुग्ण वाढू लागले आहेत. सरासरी चार जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शनिवार व रविवारी कडक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांचे शहरवासीयांनी काटेकोरपणे पालन केल्याचे चित्र शनिवारी दिसले. पहाटेपासून पोलिसांनी व पालिकेच्या पथकांनी शहरात सर्वत्र फिरून महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यास सुरुवात केली. यामुळे मेडिकल, दूध, किराणा, भाजीपाला या अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी किराणा मालाची दुकानेही बंद  होती.शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर फेरीवाल्यांनाही त्यांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे सायंकाळपर्यंत बहुतांश रस्ते, पदपथ, मार्केट परिसरात शुकशुकाट होता. बेलापूर, सीवूड, नेरूळ, जुईनगर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली ते दिघापर्यंत सर्वच परिसरात बहुतांश दुकाने बंद असल्याचे दिसले. रेल्वे स्टेशनबाहेरही शुकशुकाट होता. बाजार समितीमध्येही आवक कमी झाली होती. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे पोलीस व महानगरपालिका प्रशासनानेही सर्वांचे आभार मानले. (अधिक वृत्त - पान ४)

कोरोनाच्या भीतीने दोन दिवसाचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे रेल्वे, बस वाहतूक व्यतिरिक्त अनेक खासगी वाहने फारशी धावत नसल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. या शनिवारी ता. १० एप्रिल रोजीच्या एका दिवसात नवी मुंबईतील सुमारे २७ हजार रिक्षा, आणि २ हजार टॅक्सी चालकांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. अनेक रिक्षाचालक मालकांकडून मासिक भाडेतत्त्वावर रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा चरितार्थ करीत आहेत.  ऐरोली,दिघा,घणसोली, कोपरखैरणे परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

पेट्रोलपंप सुरु होते. मात्र वाहनांची संख्या कमी असल्यामुळे इंधन भरण्यासाठी फारशी वाहने न आल्यामुळे पंप चालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागले, असे महापे, ऐरोली आणि घणसोली येथील पेट्रोलपंप मालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीसाठी रेल्वे, बसेस सुरु होत्या मात्र प्रत्येक बसमध्ये चार ते पाच प्रवाशी प्रवास करताना दिसून आले. महापे,पावणे,खैरणे,ऐरोली, रबाले,नेरूळ आणि तुर्भे एमआयडीसीत अनेक लहान मोठ्या कंपन्यामध्ये काम बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

नागरिकांनी दिला चांगला प्रतिसादपनवेल पालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ खारघर, प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली, प्रभाग समिती ‘क’ कामोठे, प्रभाग समिती ‘ड’ पनवेल मधील मासळी बाजार, तसेच अत्यावश्यक सेवेच्या दुकानाशिवाय इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व दुकाने बंद होती. नागरिक घराबाहेर पडताना दिसत नव्हते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे सद्य:परिस्थितीमध्ये महत्त्वाचे आहे. नागरिकांनी पालिकेला यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस