शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोकणाला १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 02:24 IST

कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली.

नवी मुंबई : कोकण विभागातील सात जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे संबंधित जिल्ह्यांना वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली. कोकण विभागातील सात जिल्ह्यांतील महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारपासून कोकणातील महत्त्वाची देवस्थाने भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. या देवस्थानांत सध्या केवळ पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती दौंड यांनी दिली. विमानतळ आणि जेएनपीटी येथे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसेच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन वैद्यकीय तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली असून या ठिकाणी बाहेरून येणाºया वाहनचालकांची तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकण विभागात अनेक ठिकाणी पालखी सोहळा, यात्रा, शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तेदेखील स्थानिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही र्दौड यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेला उपायुक्त (महसूल) सिधाराम सालीमठ, उपायुक्त (पुरवठा) शिवाजी कादबाने, डॉ. गणेश धुमाळ, डॉ. बी.जी. फाळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkonkanकोकण