शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पनवेलमध्ये घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 02:39 IST

coronavirus in Panvel : कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब समोर आली असून कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पनवेल : कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब समोर आली असून कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पालिका क्षेत्रात २४०० कोविडबाधित रुग्ण असून यापैकी केवळ २३० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना आजार बरा होत असून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित घरीच बरे होत आहेत.सुरुवातीच्या काळात कोविडबाबत प्रचंड भीती निर्माण झाली होती.  प्रत्येक जण कोविडची बाधा होताच रुग्णालयात धाव घेत होता. अशा परिस्थितीत सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात मोठ्या जिकिरीने रुग्णांना बेड मिळत असत. रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत राहिल्याशिवाय आपण बरे होणार नाही, अशी भावना अनेकांची झाली होती. मात्र वर्षपूर्तीनंतर कोरोना आजार बरा होतो ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. रुग्णालयापेक्षा घरीदेखील आजार बरा होत असल्याने मोठ्या संख्येने कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची टक्केवारी तब्बल ८७ वर पोहोचली आहे.  कोविडची साथ नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न सुरू आहेत. पालिका क्षेत्रात रात्री संचारबंदीदेखील सुरू झाली असून, नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजच्या घडीला कोरोनाबाधितांचा आकडा ३१,८८८ पर्यंत पोहोचला आहे. यापैकी ३४,९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ६६९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.  

कोरोना आजार बरा होतो. कोविडची लक्षणे निदर्शनास आल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढल्यास कोविडमधून आपली नक्कीच मुक्तता होईल.    - डॉ. आनंद गोसावी (वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpanvelपनवेल