शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus:रुग्णालयांचे क्रमांक डॅशबाेर्डवर द्यावेत, शहरातील नागरिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 03:33 IST

coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे. याशिवाय किती रुग्णांवर घरामध्येच उपचार सुरू आहेत याचा तपशील देणेही आवश्यक आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात बेड्सची संख्या ३७४४ असून, रुग्णसंख्या सात हजारांपेक्षा जास्त आहे. २६८४ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, उर्वरित रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत की ते मनपाच्या संपर्काच्या बाहेर आहेत हे स्पष्ट होत नाही.              नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांमधील बेड्सची संख्या नागरिकांना माहिती असावी यासाठी संकेतस्थळावर डॅशबाेर्डची निर्मिती केली आहे. या बोर्डवर शहरातील एकूण बेड, उपचार घेणारे रुग्ण व शिल्लक बेड यांचा तपशील देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक रुग्णालयनिहाय तपशीलही दिला आहे. ही माहिती नियमित अद्ययावत करणे आवश्यक आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याविषयी वारंवार सर्व रुग्णालयांना व मनपा अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. यानंतरही माहिती अद्ययावत केली जात नव्हती. ‘लोकमत’ने याविषयी शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ माहिती अद्ययावत केली आहे; परंतु अद्याप रुग्णालयांचे व मनपाचे संपर्क नंबर देण्यात आलेले नाहीत. डॅशबोर्डवर सर्व रुग्णालयांचे नंबर देणे आवश्यक आहे. संपर्क नंबर असेल तर रुग्णांना बेडविषयी खात्री करून तेथे उपचारासाठी जाणे शक्य होणार आहे.संपर्क नंबर नसल्यामुळे अनेक रुग्ण डॅशबोर्डची माहिती घेऊन रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत; परंतु रुग्णालयात गेल्यानंतर तेथे जागा शिल्लक नसल्याचे लक्षात येते. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर्स, आयसीयूची आवश्यकता असते; परंतु संपर्क नंबर नसल्यामुळे संबंधित रुग्णालयाशी समन्वय साधता येत नाही. परिणामी राजकीय व्यक्ती व समाजसेवकांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आयुक्तांनी लवकरात लवकर संपर्क नंबर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. घरांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहितीही डॅशबोर्डवर किंवा मनपाच्या नियमित अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  ‘लोकमत’च्या बातमीची दखल महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर अपूर्ण माहिती देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचा गाेंधळ होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेऊन मनपाने सर्व माहिती तात्काळ अद्ययावत केली आहे. सर्व रुग्णालयांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.  नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी गुलदस्त्यात नवी मुंबई : शहरातील कंटेन्मेंट झोन व हॉटस्पाॅटची माहिती प्रसारित करणे महानगरपालिकेने थांबविले आहे. संबंधित ठिकाणी सूचना फलकही लावण्यात येत नाहीत. घरामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती सोसायटीला नसते. सूचना फलक व इतर उपाययोजना करण्याकडेही महानगरपालिकेचे दुर्लक्ष हाेत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या २७ मार्चच्या आदेशावरून महानगरपालिकेने हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झाेनमध्ये १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे; परंतु शहरात नक्की किती व  कोणते हॉटस्पॉट आहेत व कंटेन्मेंट झोन कुठे आहेत याविषयी माहिती पालिका नागरिकांपर्यंत पोहोचवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रसारमाध्यमांनाही याविषयी माहिती पाठविणे बंद झाले आहे. ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहे तेथे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. संबंधित सोसायटीच्या प्रवेशद्वारावर त्याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. हॉटस्पॉट असलेल्या परिसरामध्येही सूचना फलक लावणे आवश्यक आहे. आवश्यक त्या रोडवर बॅरिकेडस्‌ही लावणे आवश्यक आहे; परंतु सद्य:स्थितीध्ये मनपा प्रशासनाकडून सूचना फलक लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या इमारतीमध्ये रुग्ण सापडल्यानंतर त्याविषयी माहिती सोसायटीलाही देण्यात येत नाही.  झोपडपट्टी परिसरात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. त्या परिसरामध्येही बॅरकेडस्‌ लावणे व इतर उपाययोजना करण्यात येत नाहीत. यामुळे मनपाचे कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट फक्त कागदावरच राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होत नसल्यामुळे धोका असलेल्या ठिकाणांमध्येही नागरिकांची बिनधास्त ये-जा सुरू असल्याचे निदर्शनास  येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका