शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

Coronavirus :APMCमधील कांदा-भाजीसह फळ मार्केट 11 एप्रिलपासून बंद राहणार; बाजार समिती प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 19:03 IST

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धान्य मार्केट सुरूच राहणार आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा, भाजीसह फळ मार्केट 11 एप्रिलपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करणा-यांना मात्र परवानगी असणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धान्य मार्केट सुरूच राहणार आहे.बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील एक व्यापा-यास कोरोनाची लागण झाल्यामुळे माथाडी कामगारांसह व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना झालेला व्यापारी घाटकोपरमधील रहिवासी असून तो अनेक दिवसांपासून मार्केटमध्ये आला नसला तरी नागरिकांमधील भीती कायम आहे. घाऊक व्यापारी भाजीपाला महासंघ, फळ बाजार आवारातील फ्रंट ऑफ युनायटेड फ्रुट्स असोसिएशन, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ या व्यापारी संघटनांनी मार्केट बंद ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये कांदा-बटाटा, भाजीपाला व फळ मार्केट 11 एप्रिलपासून पुढील आदेश येईर्पयत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी याविषयी परिपत्रक काढून ते तीनही मार्केटमधील व्यापारी संघटनांना दिले आहे.भाजीपाला व फळ मार्केट बंद राहणार असले तरी शेतकरी ते ग्राहक ही योजना सुरूच राहणार आहे. या योजनेअंतर्गत सद्य:स्थितीमध्ये  प्रतिदिन 250 ते 300 टेम्पोंमधून भाजीपाला मुंबईत पाठविण्यात येत आहे. यापुढेही तो पाठविण्यात येणार आहे. फळे व कांदा-बटाटाही थेट पाठविण्यात येणार आहे. नागरिकांना गहू, ज्वारी, डाळी, कडधान्ये या वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी धान्य मार्केटमधील व्यवहार सुरू राहणार आहे.-------------------------------कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला, फळ व कांदा मार्केट बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून तीनही मार्केट 11 एप्रिलपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्याची योजना सुरू राहणार असून धान्य मार्केटही सुरू ठेवले जाणार आहे.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई बाजार समिती--------------------------------बाजार समितीमध्ये गुरुवारी मार्केटनिहाय झालेली आवकमार्केट आवक (वाहने)भाजीपाला मार्केट 134मुंबईत थेट भाजीपाला विक्री 317कांदा-बटाटा 8फळ मार्केट 305मसाला मार्केट 36धान्य मार्केट 260 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस