शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

CoronaVirus News: यंदा गोविंदा पथकांची घागर उताणीच; मिरवणुकाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 00:48 IST

आयोजकांचा निर्णय, पोलीस यंत्रणेलाही दिलासा

कोरोनाने देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होत आहे. कोरोनाच्या कचाट्यातून सण, समारंभही सुटलेले नाहीत. या महामारीचा गोकु ळाष्टमी उत्सवावरही परिणाम झाला आहे. दरवर्षी थाटामाटात साजरा होणार हा उत्सव यंदा अवघ्या पाच माणसांच्या उपस्थितीत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ७०० दहीहंड्यांसह मिरवणुकाही रद्द कण्यात आल्या आहेत, तर नवी मुंबईतीलही लाखमोलाच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत.- अनंत पाटील नवी मुंबई : या वर्षी दहीहंडी उत्सवाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी दहीहंडी उत्सव समित्यांनी या वर्षीच्या दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिघा ते बेलापूर परिसरातील अनेक मंडळांनी लाखो रुपये पारितोषिके असलेल्या दहीहंडींचा कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे. एकंदर परिस्थिती पाहता, यंदा गोविंदांची घागर उताणीच राहण्याची चिन्हे आहेत.बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा परिसरातील गावठाण आणि नोड्समध्ये गोपाळकाल्याचा जल्लोष असतो. गोविंदा पथके वाजत-गाजत, दहीहंडी फोडत शहरभर फिरत असतात. मात्र, या उत्सवावर यंदा कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. ऐरोली सेक्टर १५ येथे श्री इच्छापूर्ती गणपती मंदिर चौकात दरवर्षी सुनील स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ११ लाखांची नवी मुंबईतील सर्वांत मोठ्या बक्षिसाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेलापूर आयकर कॉलनी सेक्टर २१ आणि २२ येथे श्री गणेश स्पोटर््स क्लबच्या वतीने आयोजित होणारी एक लाखाचे पारितोषिके असलेली दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. कोपरखैरणे सेक्टर १० येथील जिजाऊ कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, घणसोली गावातील संस्कार मित्रमंडळाची १ लाखाची पारितोषिक असलेली दहीहंडी रद्द करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अंकुश नाईक यांनी दिली.ब्रिटिश राजवटीत १९०२ साली शिनवार कमळ्या पाटील यांनी ब्रिटिशांना न जुमानता, राहत्या घरी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला होता आणि आजमितीस ११८ वर्षांची दहीहंडीची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. मात्र, सरकारच्या नियमांचे पालन करून यंदा बच्चे कंपनीच्या हस्ते चार ते पाच फुटांच्या उंचीवर दहीहंडी बांधणार आहोत.- भानुदास पाटील, चौथे वंशज (स्व. शिनवार पाटील), घणसोलीकोरोनामुळे नागरिकांना आर्थिक मदतीची गरज आहे, तसेच आदिवासी पाड्यातील गरजूंना अन्नधान्य वाटप, निर्जंतुकीकरण आदी मदतकार्यामध्ये अनेक संस्था काम करीत आहेत. त्याच धर्तीवर गेल्या चार महिन्यांपासून गरजूंना मदत करण्याचे काम सुरू आहे. उत्सव दरवर्षीच होतो, पण आता मदतीचा हात देण्याची गरज आहे.- सरोज पाटील, माजी नगरसेविका, आग्रोळी, बेलापूरगर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी आम्ही ११ लाखांची पारितोषिके असलेली दहीहंडी यंदा रद्द केली आहे. या संदर्भात सरकार जो काही निर्णय घेईल, त्याचे पालन करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे.- विजय चौगुले, अध्यक्ष सुनील चौगुले स्पोटर््स असोसिएशन, ऐरोली

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीcorona virusकोरोना वायरस बातम्या