शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

CoronaVirus News: नेरुळ, कोपरखैरणेत कोरोनामुक्त वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 23:58 IST

CoronaVirus Navi Mumbai News: दिघामध्ये नियंत्रण : बेलापूरमध्ये ५,०९४ रुग्ण झाले बरे, शहरवासीयांना दिलासा

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेच्या ब्रेक द चेन मोहिमेस यश येऊ लागले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, कोपरखैरणेत ५,४३९ व बेलापूरमध्ये आतापर्यंत ५,०९४ रुग्ण बरे झाले आहेत. दिघा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत असून, तेथे सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण शिल्लक आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयनिहाय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विभागाचा प्रतिदिन आढावा घेतला जात आहे. आयुक्त अभिजीत बांगर स्वत: प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत असल्यामुळे मनपाचे डॉक्टर्स, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही गांभीर्याने काम करू लागले आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ३९,४२१ झाली होती, परंतु त्यामधील तब्बल ३४,९८० रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. नेरुळ विभागात सर्वाधिक ६,२६२ रुग्ण बरे झाले आहेत. बेलापूर व कोपरखैरणेमध्येही ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. प्रत्येक नोडमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ६०० पेक्षा कमी झाली आहे.दिघा झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना नियंत्रणात सर्वाधिक यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण पहिल्यापासून नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ६२ रुग्ण या परिसरात शिल्लक असून, सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक होऊ लागले आहे. कोरोनामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी गुरुवारपर्यंत तब्ब्ल ७९८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये ऐरोली व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी १२९ जणांचा समावेश आहे. नेरुळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा परिसरातही बळींचे शतक पूर्ण झाले आहे. दिघा व घणसोलीमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ९१.५४ व ९१.३७ झाले आहे. उर्वरित ठिकाणी हे प्रमाण ८८ ते ८९पर्यंत पोहोचले आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.निगेटिव्ह अहवाल वाढलेकोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेच्या वतीने अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. आतापर्यंत सव्वादोन लाख नागरिकांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. एकूण चाचण्यांपैकी १७ ते १८ टक्के अहवालच पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. नवीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मृत्युदरही साडेतीनवरून २ टक्क्यांवर आला आहे.नवी मुंबईमधील कोरोनामुक्त व शिल्लक रुग्णविभाग कोरोनामुक्त शिल्लक कोरोनामुक्तीचे प्रमाणनेरुळ ६२६२ ५९४ ८९.९३ऐरोली ४७५५ ५९२ ८६.८३बेलापूर ५०९४ ५२३ ८८.९६वाशी ३८४३ ५२१ ८६.५०तुर्भे-सानपाडा ४००३ ५१८ ८६.२७कोपरखैरणे ५४३९ ४९६ ८९.६९घणसोली ४५१३ ३३७ ९१.३७दिघा १०७१ ६२ ९१.५४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या