शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे दुरावतायेत नाती, चाकरमान्यांना ‘गावबंदी’चा धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 00:38 IST

लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्यापही मुंबई व पुणेकरांना प्रवेशबंदी केली जात आहे. असाच प्रकार जावळी भागात सुरू असल्याने अनेक जण नवी मुंबईसह मुंबई परिसरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न असल्याने गावच्या वेशी खुल्या करण्याची मागणी होत आहे.लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना स्थलांतराची संधी देऊनही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण गावाकडे पोहोचू शकले नाहीत. अनेक गावांमध्ये मुंबईमधून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या आहेत.गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने अटी व शर्तींसह त्यांना गावाकडे जाण्याची सवलत दिली आहे. त्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी बैठक घेऊन मुंबई पुण्याकडील व्यक्तींना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर या तुघलकी निर्णयाविरुद्ध जाणाऱ्यांना कायमच वाळीत टाकण्याचे धमकावले जात आहे. त्याचा धसका नवी मुंबईसह मुंबई, पुण्याच्या नोकरी-व्यवसाय निमित्ताने वास्तव्याला असलेल्या चाकरमान्यांनी घेतला आहे. त्यांना लॉकडाउनमुळे शहरात जगणे असह्य झाले असून, इच्छा असतानाही गावाकडे जाता येत नाहीये. त्यामुळे एका व्हायरसमुळे माणसा माणसात निर्माण झालेली दरीही दिसून येत आहे.असाच प्रकार जावळी तालुक्यात समोर आला आहे. तिथल्या काही गावांनी अद्यापही मुंबई-पुण्याच्या लोकांसाठी गावच्या वेशी बंद ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेत राहणाºया इंजिनीयर तरुणाने घरच्यांपासून दुरावल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुणही जावळी तालुक्यातीलच असल्याने मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांसाठी प्रवेश बंद करणाºया गावांनी या घटनेपासून धडा घेण्याची गरज आहे. शिवाय त्याची पुनरावृत्ती टाळली पाहिजे.गावाची दारे खुली करण्याची मागणीसध्या जावळी परिसरातील हजारो नागरिक नवी मुंबईत स्थायिक असून, केवळ ग्रामपंचायतींच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आहेत. त्यांना गावचा दरवाजा खुला करण्याची मागणी करूनदेखील अनेक ग्रामपंचायती नवी मुंबई, मुंबई व पुणेच्या नागरिकांना प्रवेश देत नसल्याचे मूळचे वाईचे सध्या जुईनगरचे रहिवासी अजय मोरे यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई