शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Coronavirus: एपीएमसीत ११ ते १७ मेपर्यंत सर्व व्यवहार बंद; ७५ रुग्ण सापडल्याने शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 07:27 IST

पाच मार्केटचे निर्जंतुकीकरण करणार

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ११ ते १७ मे पर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबईकरांना पुरेसा अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी रविवारपर्यंत मार्केट सुरू ठेवले जाणार आहेत. बाजार समितीमधील धान्य, भाजीपाला, कांदा, फळ व मसाला मार्केटमधील सर्व गाळे, इमारती, प्रसाधनगृह, रस्ते यांची विशेष साफसफाई, निर्जंतुकीकरण केले जाणार असून त्यानंतरच मार्केट पुर्ववत सुरू होणार आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवार, ७ मे पर्यंतजवळपास ७५ रुग्ण सापडले असून एपीएमसीशी संबंधित रुग्ण संख्या १२६ झाली आहे. यामुळे नवी मुंबईमधील नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यापारी व कामगार संघटनांनी मार्केट बंद करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एपीएमसीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. यावेळी ११ ते १७ मे पर्यंत पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईमधील नागरिकांना पुढील दहा दिवस जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी १० मे पर्यंत मार्केट सुरू आहेत. रविवारी ही बाजार समिती सुरू राहणार आहे. सर्व उपाययोजना व इतर नियोजन व तपासणीचे काम करण्यासाठी सहकार व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची समन्वयक व सनियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचही बाजार ११ ते १७ मे बंद असणार आहेत. यावेळी पाचही मार्केटचे विशेष निर्जंंतुकीकरण केले जाणार आहे. बाजार समितीचे कामगार, माथाडी व सर्व घटकांची स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी शासनातर्फे होणार आहे. व्यापारी त्यांच्या कर्मचाऱ्यांची स्वत: तपासणी करून घेणार आहेत. मार्केट बंद असले तरी लोकांनी घाबरू नये. मुंबई व ठाणे परिसरात १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्य व इतर माल आहे. विविध व्यापारी भाजीपाला, कांदे, बटाटे मुंबई व परिसरात पुरवित आहेत. आॅनलाईन यंत्रणेद्वारेही माल पुरवठा सुरू आहे. - अनुप कुमार, प्रधान सचिव, कृषी पणन विभागकोकण आयुक्त घेणार आढावामुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व महानगरपालिकेवर १७ मे पर्यंत विशेष जबाबदारी दिली आहे. एपीएमसीमधील सर्व समस्या सोडविण्यासाठी कोणी काय करायचे हे निश्चित केले आहे. कोकण आयुक्त शिवाजी दौंड या दोन्ही संस्थांमध्ये समन्वय साधून सर्व उपाययोजनांचा नियमीत आढावा घेणार आहेत.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस