शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मराठवाड्यातील ११ कुटुंबे अडकली खारघरमध्ये, लॉकडाउनमुळे परतीचा प्रवासही थांबला, आली उपासमारीची वेळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 00:36 IST

कोरोनाचा धोका वाढत असताना आमची हीच परिस्थिती राहिल्यास उपासमारीने आमचा भूकबळी जाईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

- वैभव गायकर पनवेल : रोजगारानिमित्त खारघरमध्ये आलेल्या मराठवाड्यातील ११ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. उस्मानाबादमधील पपलनगर येथील हे रहिवासी असून बेरोजगारीमुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे.नवी मुंबईत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत. या ठिकाणी रोजगाराच्या शोधात हजारो नागरिक येतात आणि मिळेल त्या जागी झोपड्या बांधून राहतात. जानेवारी महिन्यातच एकूण २५ कुटुंबे खारघरमध्ये दाखल झाली होती. मिळेल ते काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह ते करीत होते. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आणि त्यांचा रोजगार बुडाला. गावी परण्यासाठीही साधन नसल्याने आणि जवळची पदरमोडही संपल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे.सध्याच्या घडीला ११ कुटुंबे खारघर सेक्टर १५ व १२ ला जोडणाऱ्या रस्त्यालगतच्या झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत. खायला अन्न नाही आणि हाताला काम नसल्याने आम्हाला आमच्या मूळ गावी पाठवा, अशी विनवणी ६४ वर्षीय मोहन पवार करीत आहेत. कोरोनाच्या काळात काही जणांनी मदत केली, मात्र सध्या कोणीही फिरकत नसल्याचे सावित्री पवार यांनी सांगितले.कोरोनाचा धोका वाढत असताना आमची हीच परिस्थिती राहिल्यास उपासमारीने आमचा भूकबळी जाईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. शासनाने आम्हाला मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी व्याकूळ विनंती ते करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई