शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नवी मुंबईत कोरोना चाचण्या वाढविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 00:13 IST

प्रतिदिन दोन हजार चाचण्या : एपीएमसीमध्येही अँटिजेन तपासणी केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. अँटिजेन व आरटीपीसीआर मिळून प्रतिदिन २ हजार संशयितांची चाचणी केली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्येही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून मिशन ब्रेक द चेन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यावर व चाचणींचे अहवाल लवकर मिळेल, यावर लक्ष दिले आहे. शहरात १८ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केले आहे. या चाचणीचा अहवाल अर्धा तासात मिळत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन या केंद्रामधून १,३०० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय आरटीपीसीआरच्या जवळपास ७०० चाचण्या होत असून, दोन्ही मिळून रोज २ हजार जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २०पेक्षा जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याही तपासण्या केल्या जात आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी तेथेही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू केले आहे.

चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढलेली निदर्शनास येणार आहे. रुग्णसंख्या कमी भासविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे धोरण मनपाने स्वीकारले आहे. लवकर रुग्ण शोधून त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. वेळेत चाचण्या झाल्या, तर संबंधित रुग्णाकडून इतरांना लागण होणार नाही. यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसली, तरी त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.मृत्युदर कमी करण्यावर भरशहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाºया व्यक्तींची विशेष काळजी घेतली जात आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करण्यात येत आहे.लक्षणे दिसल्यास लपवू नकामहानगरपालिकेने नागरी आरोग्य केंद्र व फ्ल्यू क्लिनिक सुरू केली आहे. रॅपिड अँटिजेनची मोफत तपासणी केली जात आहे. यामुळे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात जावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस