शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नवी मुंबईमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:27 IST

प्रतिदिन एक हजार चाचणी क्षमता; चाचणीसाठी लागणारा विलंब पूर्णपणे थांबणार

नवी मुंबई : महापालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. प्रतिदिन एक हजार चाचण्या येथे करणे शक्य आहे. यामुळे कोरोना चाचणीसाठी लागणारा वेळ पूर्णपणे थांबणार असून, रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.

महापालिकेची स्वत:ची लॅब नसल्यामुळे कोविडच्या तपासण्यांसाठी महानगरपालिकेस शासकीय अथवा खासगी लॅबवर अवलंबून राहावे लागत होते. त्यात तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने, कोविड उपाययोजनांच्या अंमलबजवणीत अडथळा येत होता. या बाबीकडे पहिल्या दिवसापासून विशेष लक्ष दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ दोनच दिवसांत १६ जुलैपासून अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली. दिवसागणिक टेस्टिंग सेंटर वाढीवर भर देण्यात आला. सध्या २२ अँटिजेन टेस्टिंग सेंटरमधून दिवसाला २,५00 अँटिजेन टेस्ट होत आहेत. त्यामध्ये आता एका दिवसात १000 आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता आहे. या आॅटोमॅटिक लॅबची भर पडलेली आहे. यामुळे तपासणी वेगाने होणार आहे. प्रतिदिन १000 आरटी-पीसीआर चाचण्यांच्या करणे शक्य होणार आहे.सध्या कोविडच्या काळात कोविडच्या तपासण्यांसाठी वापरली जाणार असली, तरी भविष्यात हेपॅटायटिस, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरॅसिस, एचआयव्ही व इतर मॉलिक्युलर टेस्टसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे.महापालिका आयुक्तांचे आवाहन : ही संपूर्ण अ‍ॅटोमॅटिक लॅब महापालिकेसाठी एक कायमस्वरूपी महत्त्वाची उपलब्धी आहे व आरोग्य विभागाचे स्वयंपूर्ण सक्षमीकरण करणारी आहे. अँटिजेन टेस्ट आणि त्या जोडीला प्रतिदिन १000 आरटी-पीसीआर चाचण्या क्षमतेची महापालिकेची हक्काची अत्याधुनिक संपूर्ण आॅटोमॅटिक आर.टी.-पी.सी.आर. लॅब कोविड विरोधातील लढ्याला बळ देणारी असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या