शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात, नियमांचे पालन करण्यात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:37 IST

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता.

-  नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला झोपडपट्टीमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळेच सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. चिंचपाडा, कातकरीपाडासह सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, झोपडपट्टी परिसरातील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व नंतर आलेले आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही जबाबदारी नागरी आरेाग्य केंद्रांवर सोपविली. या केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनजागृती सुरु केली. प्रत्येक घरामध्ये व घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत जनजागृती केली.  नियमांचे पालन केले, तर कोरोना नियंत्रणात ठेवता येईल, हे प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबविले. आवाहन करून जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरु केली. यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या झोपडपट्टीमधील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली.झोपडपट्टी परिसरात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. चिंचपाडामध्ये सर्वात कमी २ रुग्ण आहेत. कातकरीपाडा व इंदिरानगर परिसरात प्रत्येकी ४ रुग्ण शिल्लक आहत. सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या तुर्भे परिसरातही हा आकडा ११ वर आला आहे. चिंचपाडामध्ये रुग्ण बरे हेण्याचे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. सुरुवातीच्या काळात झोपडपट्टीमुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असे बोलले जात होते, परंतु नागरी आरोग्य केंद्रांनी केलेल्या उपाययोजना व नागरिकांनी केलेले सहकार्य, यामुळे आता झोपडपट्टीमधील कोरोनामुक्तीचा पॅटर्न सुनियोजित परिसरात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉक्टरांची भूमिका ठरली आहे महत्त्वाची - झोपडपट्टी परिसरात कोरोना काळात परिश्रम घेणारे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. कातकरी पाडा येथे सुरुवातीला भावना बनसोडे व अपर्णा मालवणकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम केले.- दिघामधील डॉ.सुरेश कुंभारे, चिंचपाडा येथील डॉ.सुषमा सारुक्ते, तुर्भे येथील डॉ. कैलास गायकवाड, इलठाणपाडा येथील मिलिंद वसावे, इंदिरानगरमधील मैथीली शिंदे व आता कैलास गायकवाड यांची भूमिका महत्वाची होती.

नियमांचे काटेकोर पालननागरी आरोग्य केंद्रांमधील अधिकाऱ्यांनी लोकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन केले. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ जणांशी संपर्क साधून त्यांची तपासणी व मार्गदर्शन करण्यास प्राधान्य देण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस