शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली सर्कल येथे कंटेनरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:40 IST

रस्त्यावर सांडले डिझेल : अनेक दुचाकी घसरल्या; डिझेल चोरीचे असल्याचा संशय

कळंबोली : कळंबोली सर्कल येथे पहाटे ५ च्या सुमारास जेएनपीटीकडून भरधाव आलेल्या कंटेनरला अपघात झाल्याने तो रस्त्यावर पलटी झाला. आतील डिझेल वाहू लागल्याने रस्त्यावर सर्वत्र डिझेल पसरले होते. कंटेनरमधून डिझेल वाहतूक केलीजात असल्याने हे डिझेल चोरीचे असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. याबाबत कळंबोली पोलीस तपास करत आहेत.कळंबोली सर्कललगत आशिया खंडातील मोठे स्टील मार्केट आहे. देशभरातून अवजड वाहने स्टील मार्केटमध्ये येतात. त्याचबरोबर दिवसरात्र अवजड वाहनांची रेलचेल सुरूच असते. यात ट्रक, कंटेनर, टँकर, ट्रेलरचा समावेश आहे. दररोज मार्केटमधून कोट्यवधींची उलाढाल होत असते. चोरीचा माल तसेच डिझेलची वाहतूक होत असल्याचे रविवारी डिझेल कंटेनरला झालेल्या अपघातातून उघड झाले आहे.रविवारी पहाटे ५ च्या सुमारास जेएनपीटीकडून मुंब्य्राकडे एम एच ४ एफ पी १४६६ या क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने आला. कळंबोली सर्कल येथे चालकांचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर आडवा झाला. त्यामुळे आतील डिझेल रस्त्यावर वाहू लागले. कंटेनरमध्ये प्लास्टिक पिशव्यामध्ये पॅकिंग करून खताच्या गोण्यामध्ये बांधून डिझेलची वाहतूक केली जात होती. अपघात झाल्याने संपूर्ण रस्ता डिझेलने माखला होता.डिझेल पाण्यासारखे वाहत असल्याने भरून घेण्याकरिता लोकांची गर्दी झाली. घटनास्थळी हवालदार सुधाकर बोंबले, दीपक गायकवाड, प्रकाश भोरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आडवा झालेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला केला. या वेळी अग्निशमन दलालाही बोलवण्यात आले होते. हे डिझेल चोरीचे किंवा काळ्या बाजाराचे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कळंबोली पोलिसांनी त्यांचे नमुने घेतले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत.चारचाकीने घेतला पेटच्कळंबोली सर्कल येथे डिझेल वाहून नेणाºया कंटेनरचा अपघात झाला. त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल वाहून संपूर्ण रस्ता माखला होता.च्डिझेल सांडलेल्या रस्त्यावरून जाणाºया एका चारचाकी कारने अचानक पेट घेतला.च्अग्निशमक दलाने त्वरित आग विझवल्याने अनर्थ टळला. मात्र, डिझेलमुळे अनेक दुचाकीस्वारही या ठिकाणी घसरले.च्पोलीस तसेच अग्निशमन दलाने त्वरित उपाययोजना केल्याने या ठिकाणी जीवितहानी घडली नाही.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा