शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

कचरा प्रश्न हस्तांतरणावरून विरोधकांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:23 AM

पालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणावरून गुरुवारी पालिकेच्या विशेष सभेत विरोधक व सत्ताधाºयांमध्ये खडाजंगी झाली.

पनवेल : पालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणावरून गुरुवारी पालिकेच्या विशेष सभेत विरोधक व सत्ताधाºयांमध्ये खडाजंगी झाली. तीन महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या विशेष सभेत दुसºया क्रमांकाच्या कचरा हस्तांतरणाच्या विषयावरून हा गोंधळ पाहावयास मिळाला. दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली. शेवटी सत्ताधाºयांनी हा ठराव मतदानास ठेवून २७ विरुध्द ४६ ने मंजूर करून घेतला.नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत व आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत या विशेष महासभेला दुपारी ३ वाजता सुरु वात झाली. सर्वप्रथम आयुक्तांना आलेल्या धमकीच्या पत्राचा विरोधक, सत्ताधाºयांनी निषेध केला. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी केली. महापालिका २०१७ -१८ या आर्थिक वार्षिक मंजूर अर्थसंकल्पाचे विविध लेखाशीर्षातील रकमांचे पुनर्नियोजन करण्याबाबत या पहिल्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक संतोष शेट्टी यांनी कचरा हस्तांतरणाच्या विषयावर चर्चा सुरू के ली. या विषयावर चर्चा केल्यानंतर सत्ताधाºयांनी हा ठराव मंजुरीसाठी ठेवल्यानंतर विरोधकांनी विरोध करीत आजची सभा केवळ चर्चेसाठी असल्याचे सांगत सभागृहात व्यासपीठावर बसून सत्ताधाºयांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधाºयांनी गोंधळामुळे नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी पीठासन अधिकाºयांकडे केली. पीठासन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी देखील गोंधळ घालणाºया नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.तिसरा विषय सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मांडला होता. रस्ते, कचरा, सेप्टीक लाइन व इतर सेवा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करून अद्ययावत नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने सखोल सर्वेक्षण करण्यासाठी थर्ड पार्टी आॅडिट करण्यासाठी एजन्सी नेमण्यासंदर्भात हा विषय मांडण्यात आला होता.कंत्राटे घेण्यासाठी घाईसत्ताधारी कचरा प्रश्न हस्तांतरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी करीत आहेत. पालिका क्षेत्रात आज सिडको स्थानिकांच्या घरांवर कारवाई करीत आहे त्याचे काय या गोष्टी देखील सिडकोशी निगडित असताना सत्ताधारी केवळ कंत्राटे घेण्याच्या दृष्टीने कचरा व आरोग्य सेवा घेण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केला. नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, सतीश पाटील यांनी देखील ठेके घेण्यासाठी सत्ताधारी कचराप्रश्नी घाई करीत असल्याचा आरोप यावेळी केली.आरोग्य सुविधा हस्तांतरणाची मागणीपनवेल महानगर पालिका क्षेत्रात सर्वत्र फेरफटका मारल्यास कचराच कचरा दिसतो. आयुक्तांना पालिका स्वच्छ, सुंदर स्मार्ट करायची आहे. मात्र शहर स्वच्छ नाही तर सुंदर आणि स्मार्ट कसे होणार? असा प्रश्न भाजपा नगरसेवक संतोष शेट्टी यांनी उपस्थित करीत लवकरात लवकर कचरा व आरोग्य सुविधा हस्तांतरणाची मागणी केली.

टॅग्स :panvelपनवेल