शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:58 IST

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ऐरोली, रबाळे व तुर्भे येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारनंतर त्यांची सुटका केली.नागरिकत्व सुधारणा कायदा व देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. हा बंद शांततेत होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार नवी मुंबईत शांततेत बंद पाळण्यात आला. त्यास काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. बंदच्या अनुषंगाने पोलिसांनी गुरुवारीच वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख व्यक्तींसोबत बैठका घेतल्या होत्या. या वेळी बंदला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याशिवाय अनपेक्षित प्रकार टाळण्यासाठी शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्तही लावण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. दरम्यान, ऐरोली, रबाळे व तुर्भे येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दुपारनंतर त्यांची सुटका केली. त्यानंतर संध्याकाळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामूहिक बैठक घेऊन बंदचा समारोप करण्यात आला. या वेळी वंचित आघाडीचे राज्य सचिव राजाराम पाटील, जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांच्यासह१०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नवी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात हा बंद झाल्यानंतर वाशीत त्याचा समारोप करण्यात आला. बंद दरम्यान तीन ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता.- वीरेंद्र लगाडे,जिल्हा अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडीऐरोली, दिघ्यात कार्यकर्त्यांची धरपकडनवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्टÑीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई शाखेच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ ऐरोली आणि दिघा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी ३० ते ४० आंदोलकांना ताब्यात घेऊन दुपारनंतर सोडून दिले.सीएए कायदा लागू करण्यामागे केंद्र सरकारची दडपशाही आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, त्यामुळेच बंद पाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. ऐरोलीत बंद शांततेत पाळण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई शाखेचे संघटक राम भद्रे यांनी दिली. बंदमुळे वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाही, याबाबतही दक्षता घेतल्याचे त्यांनी सांगितले.ठाणे-बेलापूर महामार्गावर दिघा येथे सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी २० ते २५ जणांना ताब्यात घेतले. मात्र, थोड्याच वेळात त्यांना सोडून दिले. त्यानंतर याच संघटनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी ऐरोली-मुलुंड मार्गावर आंदोलन केल्यामुळे रबाळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना दुपारनंतर सोडण्यात आले. सकाळपासूनच पोलिसांकडून ऐरोली परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक