शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नाईक यांच्यावर आमचा डोळा होता, पण योग येत नव्हता - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:36 IST

गणेश नाईक यांच्यावर आमचा डोळा होता. परंतू योग येत नव्हता. अखेर तो योग आला आणि गणेश नाईक हे भाजपात दाखल झाले.

नवी मुंबई - गणेश नाईक यांच्यावर आमचा डोळा होता. परंतू योग येत नव्हता. अखेर तो योग आला आणि गणेश नाईक हे भाजपात दाखल झाले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढली आहे. राज्याच्या विकासात त्यांच्या अनुभवाचा नकीच फायदा होील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नवी मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री यांच्यासह त्यांचे पूत्र माजी खासदार यांनी 48 महापालिकेतील  नगरसेवक आणि आपल्या हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होत्या. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, महापौर जयवंत सुतार,  भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर , खासदार कपील पाटील, किरीट सोमय्या , आ.संजय केळकर , आ.निरंजन डावखरे, किसन कथोरे, नरेंद्र पाटील, जगनाथ पाटील , ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले. ठामपा नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार,भरत चव्हाण , जिल्हा बैंकेचे उपाध्यक्ष  भाऊ कु-हाडे, मुंबई बॅकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आदी उपस्थित होते. गणेश नाईक यांच्या प्रवेशाने भाजपला अधिक बलकटी मिळाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा राज्याच्या विकासाला नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.पंधरा वर्षे सत्तेत होतो. मंत्री होतो. पण येथील प्रकल्रग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न सोडवू शकलो नाही, याची नेहमीच खंत राहिल. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासह इतर काही प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीच मी आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रतिपादन गणेश नाईक यांनी यावेळी केले. याप्रसंगी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा गौरव केला.यावेळी नवी मुंबईसह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी नाईक यांच्यासह भाजपात प्रवेश केला...

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGanesh Naikगणेश नाईक