शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी क्लृप्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:49 IST

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदानाविषयीचे प्रशिक्षण दिले जात असून, त्यांच्यासाठी वाहतुकीचीही व्यवस्था केली जाणार आहे. तर लहान मुलांच्या पालकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोसायटीनिहाय पाळणाघर सुरू केले जाणार आहे.२९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे. निवडणूक विभागही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवताना दिसत आहे. दिव्यांगांसाठीही विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याकरिता दृष्टिहीन, कर्णबधीर अथवा मूकबधीर यांच्यासह अपंगांचा शोध घेतला जात आहे. सद्यस्थितीला ऐरोली विधानसभा क्षेत्रात २८९ तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात २३४ अपंग मतदार आहेत. त्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निवडणूक विभाग करत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी ऐरोली येथील निवडणूक विभाग कार्यालयाच्या आवारात विकलांग मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला परिसरातील १०० हून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला सूर्यवंशी-थिटे, पालिकेच्या सहायक आयुक्त संध्या अंबादे, निवडणूक विभागाचे अधीक्षक अरविंद उरसळ आदीनी मार्गदर्शन केले. उपस्थित अपंग व्यक्तींना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच उर्वरित अपंग व्यक्तींपर्यंतही पोहोचून त्यांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्यास निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. तळमजल्याव्यतिरिक्त वरच्या मजल्यावर मतदान केंद्र असेल, अशा ठिकाणी वृद्ध अथवा अपंग व्यक्तींसाठी डोलीचीही व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दृष्टिहीन व्यक्तींनाही मतदान करता यावे, याकरिता त्यांना वोटिंग मशिनवरील ब्रेल लिपीविषयी माहिती दिली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे