शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३८८७ खड्डे असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:46 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये फक्त ३८८७ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये फक्त ३८८७ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यामधील ३०४५ खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी ९५ लाख रुपये खर्च होणार असून खड्डे पूर्णपणे बुजविल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराला पैसे दिले जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नवी मुंबईकर नागरिकही खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. शिरवणे, तुर्भे, महापे, पावणे ते दिघापर्यंत औद्योगिक वसाहतीमधील अनेक रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. शहरातही प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचे पडसाद मंगळवारी स्थायी समितीमध्ये उमटले. शिवसेना नगरसेवक बहादूर बिष्ट यांनी खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. शहरात नक्की किती खड्डे आहेत, किती खड्डे बुजविले, खड्डे बुजविण्यासाठी किती पैसे खर्च केले, अशी विचारणाही त्यांनी केली. या कामामध्ये घोटाळा होत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, शहरातील खड्ड्यांचे सर्वेक्षण केले असून ३८८७ मोठे खड्डे आढळून आले आहेत. त्यामधील ३०४५ खड्डे बुजविण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अद्याप ठेकेदाराला काहीच रक्कम देण्यात आलेली नाही. प्रशासनाने दिलेल्या खड्ड्यांच्या आकडेवारीविषयी लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केली आहे.