शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाईने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:43 IST

सिडकोविषयी नाराजी : आंदोलनाचा इशारा

कळंबोली : नवीन पनवेलमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचे सिडकोकडून निवारण होताना दिसत नाही. त्यामुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नाही. पाणीटंचाईवर मात करून अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सिडकोकडे केली आहे.नवीन पनवेल सिडको वसाहतीत पाणीपुरवठा करण्यासाठी एमजेपीकडून मागणीप्रमाणे सिडकोला पाणी दिले जात नाही. याचे कारण म्हणजे जुनाट झालेल्या जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहेत, तर टाटा पावर कंपनीकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशी शटडाउन घेतला जातो. म्हणून एमजेपीला पाणी मिळत नाही. सध्या नवीन पनवेलमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या वर्षभरापासून सिडको वसाहतीत पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी टाक्या सुद्धा नाहीत. त्यामुळे एमजेपीकडून मिळणाऱ्या पाण्यावर सिडको वसाहतींना अवलंबून राहावे लागते. सद्यपरिस्थिती तर खूपच हलाखीची झाली आहे. दोन ते तीन दिवसाआड पाणी येते. तेही केवळ अर्धा तास पाणी मिळते, तर सेक्टर १५ ते १६ पर्यंत पाणी पोहचेपर्यंतच पाणीपुरवठा बंद होतो, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवीन पनवेलला ४0 एमएलडीची गरज आहे, तर आता २८ एमएलडीच एमजेपीकडून पाणी येत आहे. त्याचबरोबर रविवार आणि महाराष्ट्र दिनाची सुटी असल्याने टाटा पावर कंपनीने शटडाउन घेतल्याने पाणीटंचाई भासत असल्याचे मत नवीन पनवेल सिडको पाणीपुरवठा अधिकारी राहुल सरवदे यांनी लोकमतला सांगितले.

माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांनी सांगितले की, नवीन पनवेलध्ये मुबलक पाणी मिळत नाही, तर कमी दाबाने पाणी मिळत आहे. तीन दिवसाआड पाणी येते. तेही फक्त अर्धा तासासाठी सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. मुबलक पाण्यासाठी सिडको उपाययोजना करत नाहीत. या प्रश्नाबाबत आम्ही पाणीपुरवठा विभागाला उपाययोजनेसाठी पत्र दिले आहे.टँकरद्वारेही पाणीपुरवठा नाही

एमजेपीकडून पाणीपुरवठाकमी होत आहे. वारंवार जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. आता फक्त २८ एमएलडी पाणी मिळते. सुटीमुळे शटडाउन घेतल्यानेही पाणी मागणीपेक्षा पाणी कमी मिळते. पाणीटंचाई भासत असल्याने टँकरद्वारेही पाणीपुरवठा करता येत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpanvelपनवेल