शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 01:16 IST

Navi Mumbai : राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत.

नवी मुंबई : अनलॉक संदर्भातील नवीन नियमावली जाहीर करताना राज्य शासनाच्या माध्यमातून नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे लागणार असून, त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सिनेमागृहे बंद होती. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्याअनुषंगाने राज्य सरकारनेदेखील ५० टक्के क्षमतेने नियमांचे पालन करून ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे,  मल्टिप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने सिनेमागृह चालक, मालकांना शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालनासाठी नियोजन करावे लागणार आहे. 

कारवाईकडे सर्वांचे लक्ष सिनेमागृह सुरू करण्याच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कोणतीही पूर्वतयारी नसल्याने गुरुवारी नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, सीवूड भागातील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. स्वच्छता, ५० टक्के क्षमतेसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून सर्व नियमांचे पालन करणार असल्याचे सिनेमागृह चालकांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस