शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सिडकोची उदासीनता : खारघरच्या सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 02:56 IST

सिडकोची उदासीनता : १०० कोटींचा खर्च व्यर्थ; कलाकृतींची मोडतोड; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानात कारंजेही बंद

नामदेव मोरे 

नवी मुंबई : लंडनच्या हाइडपार्कच्या धर्तीवर खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची घोषणा सिडकोने केली होती. १०० कोटी खर्च करून २०१० मध्ये पहिला टप्पा पूर्ण केला होता; परंतु आठ वर्षांत उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. लोकसंगीताची माहिती देणाऱ्या थीम पार्कमधील कलाकृतींची तोडफोड झाली आहे. कारंजे बंद आहेत. विश्रांतीसाठीच्या स्मार्ट हटचे खंडरात रूपांतर झाले असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणारी सिडको भव्य प्रकल्पांची घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करत नाही. खारघरमधील सेंट्रल पार्कचीही अशीच स्थिती झाली आहे. येथील २९० एकर जमिनीवर लंडनमधील हाइडपार्कच्या धर्तीवर भव्य उद्यान बनविण्याचा संकल्प करण्यात आला होता. २५ जानेवारी २०१० मध्ये यामधील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख होईल अशाप्रकारे उद्यानाची रचना केली होती. उद्यानाच्या सुरुवातीलाच पखवाज, पेटी व इतर वाद्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. समोर तळ्यामध्ये कारंजे बसविण्यात आले होते. अ‍ॅम्पी थिएटरच्या बाजूला नागरिकांना बसता यावे यासाठी स्मार्ट हट ही संकल्पना राबवून निवारा केंदे्र तयार केली होती. भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम् व इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी अशाप्रकारचे थीम पार्क तयार केले होते. उद्यानात आवश्यक त्या ठिकाणी प्रशस्त फूडकोर्ट, प्रसाधनगृहांची रचना केली होती.सिडकोने कागदावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान तयार केले; परंतु प्रत्यक्षात ते साकारू शकले नाही. २०१० मध्ये लोकार्पण केलेल्या पहिल्या टप्प्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. ८ वर्षांमध्ये एकही फूडकोर्ट सुरू होऊ शकले नाही. प्रवेशद्वारावरील एकच प्रसाधनगृह सुरू ठेवण्यात आले आहे. तलावामधील व आतमधील कारंजे बंदच आहेत. ढोलकी, तबला यांच्या प्रतिकृतींची तोडफोड झाली आहे. स्मार्ट हटचे छप्पर उडाले असून प्रचंड गवत उगवल्यामुळे तेथे उभेही राहता येत नाही. सर्वात गंभीर स्थिती लोकसंगीताच्या थीम पार्कची झाली आहे. येथील नृत्याची माहिती देण्यासाठी उभारलेल्या कलाकारांच्या पुतळ्यांचे हात, पाय तुटले आहेत. लोकसंगीताचा अवमान होत असून त्याकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. छोट्या अ‍ॅम्पी थिएटरचीही दुरवस्था झाली आहे. मुलांसाठी बसविण्यात आलल्या खेळण्यांचीही दुरवस्था झाली आहे. तब्बल १०० कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या उद्यानाची वाताहत पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरु केली आहे. सिडकोने नैना परिसरात २३ स्मार्ट सिटी बनविण्याची घोषणा केली होती. दक्षिण नवी मुंबई देशातील पहिले स्मार्ट शहर बनविण्याची घोषणाही केली होती; परंतु प्रत्यक्षात एकही चांगले उद्यान बनविता आले नसल्याची टीका केली जाऊ लागली आहे.सेंट्रल पार्कमधील वास्तवच्उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील ढोलकी, तबल्याची मोडतोडच्नागरिकांच्या सुविधेसाठीच्या पाणपोई बंदच्उद्यानातील नैसर्गिक तलाव व इतर ठिकाणचे कारंजे बंदच्अ‍ॅम्पी थिएटरची देखभाल करण्याकडे दुर्लक्षच्२०१० पासून फूडकोर्ट सुरूच केले नाहीतच्उद्यानामधील फक्त दोनच प्रसाधनगृहे सुरूच्आसनव्यवस्थेसाठीच्या स्मार्ट हटची दुरवस्थाच्भारतीय संगीत कलेची माहिती देणाºया थीम पार्कमधील प्रतिकृतींची मोडतोडच्लहान मुलांसाठीच्या खेळण्यांची मोडतोडव्यवस्थापकीय संचालकांनी भेट द्यावीखारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनविण्याची घोषणा सिडकोने केली होती; परंतु प्रत्यक्षात उद्यानाचे खंडरात रूपांतर झाले आहे. उद्यानाची अवस्था पाहिल्यानंतर नागरिक सिडकोच्या कार्यक्षमतेवरच टीका करू लागले आहेत. सिडको घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सेंट्रल पार्कला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.पहिला टप्पाच फसला : सेंट्रल पार्क दोन टप्प्यात करण्याचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात पहिला टप्पा नियोजनाप्रमाणे कार्यान्वित करता आलेला नाही. सिडकोचे नियोजन पूर्णपणे फसले असून उद्यान निर्मितीवर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. यामुळे दुसरा टप्पा कधी व कसा पूर्ण केला जाणार, असा प्रश्नही नागरिक विचारू लागले आहेत.नागरिकांची निराशाखारघरमधील सेंट्रल पार्क किती भव्य आहे याची माहिती सिडकोच्या संकेतस्थळावरही देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान अशी जाहिरात करण्यात आली आहे. ही माहिती पाहून मुंबई, नवी मुंबई परिसरातूनही नागरिक उद्यान पाहण्यासाठी येत आहेत; परंतु उद्यानाची अवस्था पाहून निराशा होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या नावाने सिडकोने फसवणूक केल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई