शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १६ भूखंडांचा सिडकोने घेतला ताबा; निविदा काढून लवकरच केली जाणार विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:19 IST

जप्त केलेल्या या भूखंडांची निविदा काढून विक्री केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रद्द केलेल्या १६ भूखंडांचा सिडकोने सोमवारी ताबा घेतला. या सर्व भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ ७५००० चौरस मीटर इतके असून त्याचे बाजारमूल्य सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. जप्त केलेल्या या भूखंडांची निविदा काढून विक्री केली जाणार आहे. 

सिडकोच्या भूखंडाचे वाटप झाल्यापासून चार वर्षांत बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र घेणे नियमाने बंधनकारक आहे. तसेच शुल्क अदा करून त्यासाठी मुदतवाढ घेण्याचीही तरतूद आहे. त्यासाठी सिडकोने अभय योजना राबविली होती. मात्र, त्यालाही प्रतिसाद दिला गेला नाही. शेवटी संबंधित विभागांने या सोळा भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या.  मात्र, त्यांनाही केराची टोपली दाखविली गेली. याची गंभीर दखल घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन हे भूखंड वाटप रद्द करून ताब्यात घेण्याचे निर्देश १ एप्रिल रोजी दिले होते. त्यानुसार संबंधित विभागाने या भूधारकांना ३ एप्रिल रोजी जप्तीच्या नोटिसा बजावून सोमवारी शहर वसाहत  (१) आणि शहर वसाहत विभाग (३)  चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सोळा भूखंडांचा ताबा घेतला. 

सिडकोने ताबा घेतलेल्या भूखंडांचा तपशील सोमवारी ताबा घेतलेल्या सोळापैकी १२ भूखंड शहर वसाहत विभाग (१) अर्थात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. तर उर्वरित ४ भूखंड शहर वसाहत विभाग (३) अर्थात सिडको कार्यक्षेत्रातील आहेत.  वाशी सेक्टर १९ एफ येथील  १ आणि ५ क्रमांकाचे भूखंड  वेअर हाउससाठी  तर वाशी  सेक्टर १८ येथील २६ क्रमांकाचा १६०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड शीतगृहासाठी वाटप केला आहे. त्याचप्रमाणे  ताबा घेतलेल्या यादीतील एक भूखंड रुग्णालयासाठी आहे. तर उर्वरित सर्व भूखंड निवासी आणि वाणिज्यिक वापरासाठीचे आहेत. यातील एक भूखंड वनमंत्री गणेश नाईक यांच्या जवळच्या बिल्डरला दिलेला आहे.

ताबा घेतलेल्या सर्व भूखंडांच्या विक्रीसाठी तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देेश व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संबंधित विभागाला दिल्याचे समजते. 

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबई