शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक

By कमलाकर कांबळे | Updated: November 24, 2022 14:52 IST

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने त्या भाड्डेपट्ट्याने अर्थात लीज होल्डवर दिल्या आहेत.

नवी मुंबई :सिडकोचानाशिक शहरातील कार्यभार संपुष्टात आला आहे. त्यानुसार या क्षेत्रात भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापूर्वी औरंगाबाद येथील सिडकोच्या भाडेतत्त्वावरील जमिनी फ्री होल्ड करण्यात आल्या. औरंगाबादपाठोपाठ आता नाशिकमधील सिडकोचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे सिडकोच्या नाशिक कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सिडकोच्या नवी मुंबई कार्यालयात बदल्या केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. 

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने त्या भाड्डेपट्ट्याने अर्थात लीज होल्डवर दिल्या आहेत. त्यामुळे या लीज होल्डच्या जमिनी फ्री हाेल्ड कराव्यात, ही नवी मुंबईकरांची जुनी मागणी आहे. औरंगाबाद येथील जमिनी याअगोदरच फ्री होल्ड केल्या आहेत. पाठोपाठ आता सिडकोचे नाशिक येथील कार्यालय बंद करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. 

भाडेपट्ट्याची मुदत वाढविली नवी मुंबईतील जमिनीही फ्री हाेल्ड कराव्यात, अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. त्यानुसार २०१९ मध्ये राज्य शासनाने नवी मुंबईतील जमिनीही फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला; परंतु तो म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे नंतर स्पष्ट झाले. कारण फ्री होल्डच्या नावाखाली भाडेपट्ट्याची मुदत ६० वर्षांवरून ९९ वर्षे केली आहे. मुळात फ्री हाेल्ड म्हणजे सिडकोच्या बंधनातून मुक्त होणे अपेक्षित असताना राज्य शासनाने नवी मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.

नाशिक कार्यालयात राहणार अवघे चार कर्मचारी -सिडकोच्या विक्री न झालेल्या मालमत्ता आणि  मोकळ्या भूखंडांची अभिलेखामध्ये नोंद करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असणार आहे.  सिडकोचे नाशिक येथील कामकाज संपुष्टात आल्याने  या भागातील सिडकोच्या लीज होल्डवरील जमिनी फ्री होल्ड केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत  सिडकोचे  कार्यालय सुरू राहील, असे नगरविकासने सूचित केले.

सिडकोशी संबंधित काही कामेही प्रलंबित आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक कर्मचारी कायम ठेवून उर्वरित कर्मचाऱ्यांची सिडकोच्या अन्य विभागात बदलीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नवी मुंबईत बदली केली आहे.  नाशिक कार्यालयात  चार कर्मचारी कायम ठेवले आहेत.  

टॅग्स :cidcoसिडकोNashikनाशिकNavi Mumbaiनवी मुंबईAurangabadऔरंगाबाद