शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

डीपीएस तलावप्रकरणी सिडकोने नवी मुंबई महापालिकेस पोलिसांत खेचले

By नारायण जाधव | Updated: June 14, 2024 20:00 IST

सिडकोविरोधात नवी मुंबई महापालिका, पर्यावरणप्रेमी, वनविभागात संताप

नवी मुंबई : घाटकोपर येथे एमिरेटसच्या विमानाने दिलेल्या धडकेत ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्यानंतर हळहळलेल्या ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मे महिन्यात या गुलाबी पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या डीपीएस तलावाची पाहणी करून आठवडाभरात त्यात येणारे भरतीचे पाणी रोखणारे चोक पॉइंट तोडण्यासाठी आठवडाभराचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर महापालिकेने चोक पॉइंट तोडले असले तरी बिथरलेल्या सिडकोने नवी मुंबई महापालिकेसह संबधित ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

सिडकोच्या या तक्रारीनंतर आता सिडको, नवी मुंबई महापालिका, पर्यावरणप्रेमी आणि वनविभागात जुंपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मे महिन्यात दिलेल्या भेटीप्रसंगी नाईक यांनी आठवडाभरात चोक पॉइंट (भरतीचा प्रवाह तलावात येण्यासाठी बुजविलेला मार्ग) तोडले नाहीत तर स्वत: मैदानात उतरून जेसीबी लावून ते तोडतील, असे सिडकोचे मुख्य अभियंता एन. सी. बायस आणि त्यांच्या सहकारी व नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतर महापालिकेने हे चोक पाॅइंट तोडले असले तरीही सिडकोने आता उशिरा नवी मुंबई महापालिका आणि काम करणाऱ्या ठेकेदार मे. भारत उद्योग याच्याविरोधात तक्रार करून उचित कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हटले आहे सिडकोच्या तक्रारीत..नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तलाव परिसरातील पूर्वीचे ३०० मिमी व्यासाचे पाइप आऊटलेट तोडून नवे ६०० मिमी व्यासाचे इनलेट/आऊटलेट काम केले आहे. तसेच महापालिकेने या ठिकाणी २८ मे २०२४ पासून १० हॉर्स पाॅवरचे दोन पंचसेट बसवून खाडीचे पाणी सिडको क्षेत्रात घेतले आहे. खाडीचे पाणी आत घेतल्याने परिसरातील सिडकाेच्या भूखंडांवर खारफुटी वाढून त्यांचा विकास करणे अशक्य होणार आहे. यामुळे सिडकोचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे आपल्या तक्रारीत सिडकोचे कार्यकारी अभियंता वाशी विभाग यांनी एनआरआय सागर पोलिसांत केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

मग सिडकोच्या दोषी अधिकाऱ्यांचे काय?डीपीएस तलावातील पाण्याचा प्रवाह रोखून सिडको अधिकाऱ्यांनी या ३० एकर तलाव क्षेत्राचे व्यापारीकरण करण्याचा आरोप आहे. तसेच येथे जलवाहतूक जेट्टी बांधण्यासाठी सिडकोने रस्ता बांधल्याने गुलाबी पक्ष्यांना अन्न मिळणे दुरापास्त होऊन ते इतरत्र भरकटून नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटीची ओळख नष्ट होऊ शकते, यामुळे खारफुटी क्षेत्राचे व्यापारीकरण पाहणाऱ्या सिडकोच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी गणेश नाईक यांनी आपल्या भेटीत केली होती. मात्र, आता सिडकोनेच नवी मुंबई महापालिकेविराधोत तक्रार केल्याने त्यांच्या दोषी अधिकाऱ्यांचे काय, असा प्रश्न नॅटेकनेक्टचे बी. एन.कुमार यांनी विचारला आहे.

खारफुटी संवर्धन समितीने केली पाहणीनॅटकनेक्ट फाउंडेशनच्या तक्रारीवरून न्यायालयाने नेमलेल्या खारफुटी संरक्षण आणि संवर्धन समितीने या तलावास भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही पाश्वभूमी असतानाही सिडकोन हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई