शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वाहने न वापरताच सिडकोतील अधिकाऱ्यांचा वाहनभत्त्यावर डल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 02:59 IST

ओन युवर व्हेईकल योजनेअंतर्गत सिडकोने आपल्या आस्थापनेतील प्रथम वर्ग श्रेणीतील अधिका-यांसाठी वाहनभत्ता योजना सुरू केली आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : ओन युवर व्हेईकल योजनेअंतर्गत सिडकोने आपल्या आस्थापनेतील प्रथम वर्ग श्रेणीतील अधिका-यांसाठी वाहनभत्ता योजना सुरू केली आहे. परंतु काही अधिकारी अंमलबजावणीतील त्रुटीचा आधार घेत आपली वाहने न वापरताच वाहनभत्त्यावर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सिडकोचा कारभार विविध आठ विभागांच्या माध्यमातून चालतो. या विभागाच्या प्रमुखपदी प्रथम श्रेणी दर्जाच्या अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रथम वर्ग अधिका-यांसाठी सिडकोने मध्यंतरी वाहनभत्ता योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा ही योजना कार्यरत होती; परंतु सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या काळात ती बंद करण्यात आली. त्याऐवजी टुरिस्टच्या वाहनांचा अवलंब करण्यात आला; परंतु ट्रॅव्हल एजन्सीकडून येणारी वाहने नादुरुस्त तसेच ती अधिक खर्चीक जाणवू लागल्याने सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ट्रॅव्हल्स एजन्सीकडून वाहने घेण्यास मज्जाव करीत वरिष्ठ अधिकाºयांसाठी ओन युवर व्हेईकल ही योजना आणली. या योजनेअंतर्गत अधिकाºयांनी कार्यालयीन कामासाठी स्वत:चे वाहन वापरणे बंधनकारक करण्यात आले. त्याबदल्यात संबंधितांना वाहनभत्ता म्हणून प्रति महिना २५ हजार रुपये निश्चित करण्यात आले. त्यानुसार मागील चार वर्षांपासून सिडकोत ओन युवर व्हेईकल ही योजना सुरू आहे; परंतु काही अधिकाºयांनी या योजनेला हरताळ फासत वाहनभत्त्यापोटी सिडकोची लूट चालविली असल्याचे दिसून आले आहे.ओन युवर व्हेईकल योजनेअंतर्गत स्वत:चे वाहन वापरणाºया अधिकाºयाने आपल्या वाहनांची नोंदणी संबंधित विभागाकडे करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात ३० ते ३५ अधिकाºयांनी आपल्या वाहनांची नोंदणी केली. त्यानुसार त्यांना वाहनभत्त्यापोटी प्रतिमहिना २५ हजार रुपयांचा लाभही सुरू झाला. मात्र, नंतरच्या काळात काही अधिकाºयांनी स्वत:चे वाहन वापरणे बंद करीत इतर पर्यायी वाहनांचा अवलंब सुरू केला. अशा परिस्थितीत संबंधित अधिकाºयाला मिळणारा वाहनभत्ता बंद होणे गरजेचे असतानाही आजतागायत तो सुरूच असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. या प्रकारामुळे सिडकोला महिन्याला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे सिडकोतील प्रथम श्रेणीच्या घटकांकडून सुरू असलेल्या या गैरप्रकाराला आळा घालण्याची गरज असल्याचे मत कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.सिडकोच्या तिजोरीवर ९0 लाखांचा भारसिडकोत जवळपास ३० अधिका-यांनी वाहनभत्ता योजनेसाठी आपल्या वाहनांची नोंदणी केली आहे. प्रत्येक वाहनाला महिन्याला २५ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला ९0 लाख रुपयांचा भार सिडकोच्या तिजोरीवर पडत आहे. काही प्रामाणिक अधिकाºयांचा अपवाद सोडता दिशाभूल करून सिडकोच्या तिजोरीवर डल्ला मारणाºया अधिका-यांची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.सिडकोच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या जवळपास २५ ते ३0 अधिकाºयांना ओन युवर व्हेईकल योजनेअंतर्गत स्वत:चे वाहन वापरण्यासाठी वाहनभत्ता मंजूर करण्यात आला आहे; परंतु काही मोजक्या अधिकाºयांचा अपवाद वगळता बहुतांशी अधिकारी या योजनेला हरताळ फासत वाहनभत्त्यावर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागाकडून या योजनेचे लॉगबूक मेन्टेन नसल्यानेच या प्रकाराला चालना मिळत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको