शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या आनंदावर विरजण, महापालिकेचा विकास आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:53 IST

सीवूड्स सेक्टर ५४, ५६ आणि सेक्टर ५८ मध्ये विस्तारलेला सुमारे २५००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने विक्रीसाठी काढला आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या आहेत.

नवी मुंबई : पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे चर्चेत आलेल्या नेरूळ, सीवूड्स येथील २५००० चौरस मीटरच्या भूखंडावर महापालिकेने आपल्या विकास आराखड्यात आरक्षण टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. सीआरझेडमध्ये मोडत असलेला हा भूखंड महापालिकेने नागरी सुविधा केंद्रासाठी आरक्षित केला आहे. अडीच वर्षांनंतर महापालिकेने हा विकास आराखडा नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी खुला केला आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाल्याने एकीकडे पर्यावरणवाद्यांनी सिडकोविरोधात आता आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर या भूखंड विक्रीतून शेकडो कोटींचा महसूल मिळविण्याच्या सिडकोच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सीवूड्स सेक्टर ५४, ५६ आणि सेक्टर ५८ मध्ये विस्तारलेला सुमारे २५००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने विक्रीसाठी काढला आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या आहेत. परंतु, हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने पर्यावरणवाद्यांनी या भूखंड विक्रीला तीव्र विरोध दर्शविला आहे. काही हरितप्रेमींनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देशही एमसीझेडएमएला दिले आहेत. तरीही सिडकोने आपली भूमिका कायम ठेवली आहे.

याच दरम्यान म्हणजेच गुरुवारी महापालिकेने आपला विकास आराखडा नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी उपलब्ध केला आहे. यात संबंधित भूखंडावर महापालिकेने अगोदरच नागरी सुविधा केंद्रासाठी आरक्षण केल्याचे स्पष्ट झाल्याने सिडकोला चपराक बसली आहे. पर्यावरणवाद्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेऊन शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने आपल्या भूखंड विक्रीच्या धोरणाला बगल द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्य शासनाकडे तक्रारसार्वजनिक सुविधा केंद्रात वाचनालय, खेळाचे मैदान, व्यायामशाळा आदी सुविधांचा समावेश होतो. सिडकोने विक्रीसाठी काढलेल्या नेरूळ येथील भूखंडावर महापालिकेने हेच आरक्षण चिन्हांकित केले आहे. तरीही सिडकोने हा भूखंड  वाणिज्य आणि निवासी वापरासाठी उपलब्ध करून तो विक्रीस काढला आहे.

या भूखंडावर ५० मजल्यांची टोलेजंग इमारत बांधण्याचे नियोजन आहे. एकूणच सिडकोची ही कृती नवी मुंबईकरांच्या अधिकारावर गदा असणारी असल्याचे नाट कनेक्टचे संचालक तथा पर्यावरणप्रेमी बी.एन. कुमार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडे तक्रार केली असून, योग्य कारवाईची मागणी त्यांनी  केली आहे.

टॅग्स :cidcoसिडको